ठेकेदारांची वाढीव बिले काढण्यासाठी पत्रच दिले नाही : उमेश सकपाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:22 IST2021-07-02T04:22:11+5:302021-07-02T04:22:11+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : ठेकेदारांची वाढीव बिले काढावी, यासाठी मी कुठल्याही प्रकारचा पत्रव्यवहार पालिकेशी केलेला नाही. हे केवळ ...

No letter for issuing increased bills of contractors: Umesh Sakpal | ठेकेदारांची वाढीव बिले काढण्यासाठी पत्रच दिले नाही : उमेश सकपाळ

ठेकेदारांची वाढीव बिले काढण्यासाठी पत्रच दिले नाही : उमेश सकपाळ

लाेकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण : ठेकेदारांची वाढीव बिले काढावी, यासाठी मी कुठल्याही प्रकारचा पत्रव्यवहार पालिकेशी केलेला नाही. हे केवळ मला बदनाम करण्याचे षड्यंत्र आहे, मी केवळ मागील सभेत झालेल्या ठरावाला अविनाश केळस्कर हे सूचक होते, त्यांनी आपण या ठरावाचे सूचक राहणार नाही, असे कळविल्यामुळे माझे नाव सूचक म्हणून घ्यावे एवढेच पत्र दिल्याचा स्पष्ट खुलासा शिवसेनेचे गटनेते शहरप्रमुख उमेश सकपाळ यांनी केला आहे.

गेल्या दोन-तीन दिवसांपासून खासदार विनायक राऊत यांनी शिवसेना नगरसेवकांची बैठक घेतली व या बैठकीत सकपाळ यांनी ठेकेदारांची वाढीव बिले काढावीत, यासाठी पत्र दिल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत खासदार विनायक राऊत यांनी सकपाळ यांना झापले, अशी चर्चा आहे. परंतु, असा कसलाही प्रकार घडलेला नाही, असा खुलासा सकपाळ यांनी केला आहे. याबाबत ते म्हणाले की, अशाप्रकारचे कुठलेही पत्र दिलेले नाही. मुळात १२ एप्रिल २०२१ रोजीच्या विशेष मुख्य सभेतील विषय क्रमांक ४ बांधकाम विभागाकडील विशेष रस्ता अनुदानातील एक ते चार कामे व पालिका फंडातील पाच ते सात कामे मुदतवाढ देऊन पूर्ण करून घेण्याबाबत सर्वानुमते ठराव झाला होता. या ठरावाचे सूचक म्हणून राजेश महादेव केळस्कर यांचे नाव नोंदविण्यात आले होते. परंतु, राजेश केळस्कर यांनी लेखी पत्र देऊन त्यांचे सूचक म्हणून नोंदवलेले नाव वगळण्याबाबत नगराध्यक्षांना कळविल्याचे आपल्याला समजले. त्यामुळे १४ मे २०२१ रोजी नगराध्यक्षांना पत्र पाठवून मंजूर झालेल्या ठरावाचा महाविकास आघाडीचा सदस्य तसेच शिवसेनेचा गटनेता म्हणून माझे नाव सूचक म्हणून नोंदविण्यात यावे, असे कळविल्याचे सकपाळ यांनी सांगितले. यामध्ये ठेकेदारांची बिले काढण्याबाबत कसलाही उल्लेख करण्यात आलेला नाही, असेही स्पष्ट केले.

Web Title: No letter for issuing increased bills of contractors: Umesh Sakpal