मोअझ्झम कापडे ‘युवा संशोधक पुरस्काराने’ सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:20 IST2021-07-03T04:20:34+5:302021-07-03T04:20:34+5:30

आरवली : संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथील युवा अभियंता मोअझ्झम वाहिद कापडे यांना त्याच्या इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल ...

Moazzam Clothing honored with ‘Young Researcher Award’ | मोअझ्झम कापडे ‘युवा संशोधक पुरस्काराने’ सन्मानित

मोअझ्झम कापडे ‘युवा संशोधक पुरस्काराने’ सन्मानित

आरवली : संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथील युवा अभियंता मोअझ्झम वाहिद कापडे यांना त्याच्या इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल बेंगलोर येथील इन्स्टिट्यूट ऑफ स्कॉलर या संस्थेतर्फे ‘युवा संशोधक पुरस्कार २०२१ (यंग रिसर्चर अवॉर्ड, २०२१)’ ने सन्मानित करण्यात आले.

मोअझ्झम वाहिद कापडे हे कडवई येथील एक युवा इलेक्ट्रिकल इंजिनीअर म्हणून काम करत आहेत. त्यांनी कापडे इलेक्ट्रिकल सर्व्हिसेस नावाने संस्था स्थापन केली आहे. ते आपल्या शॉर्टटर्म ऑफलाइन इंटरशिप, ऑनलाइन बेबिनार आणि सुसंरचित कोर्सच्या माध्यमातून जागतिक स्तरावर इच्छुक विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिक इंजिनीअरिंगबद्दल शिकण्याची उत्तम संधी देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात. त्यांच्या इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग आणि वैद्यकीय उपकरणाच्या क्षेत्रातील अभिनव कल्पनांसाठी अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय रिसर्च पेपर व प्रकल्प स्पर्धाही जिंकल्या आहेत.

त्यांच्या या इनोव्हेशन इन इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल इन्स्टिट्यूट ऑफ स्कॉलर या बेंगलोर येथील संस्थेने ‘युवा संशोधक पुरस्कार २०२१’ या पुरस्काराने सन्मानित केले आहे.

Web Title: Moazzam Clothing honored with ‘Young Researcher Award’