शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
5
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
6
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
7
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
8
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
9
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
10
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
11
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
12
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
13
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
14
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
15
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
16
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
17
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
18
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
19
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
20
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

खेडमध्ये मनसेला जोर का झटका; सेनेचा स्वीकार

By admin | Updated: August 13, 2015 22:52 IST

धक्कातंत्र : तालुका उपाध्यक्षांसह सर्वच अडकले शिवबंधनात

खेड : खेड तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उपाध्यक्षांसह ४१ पदाधिकारी आणि १५२ कार्यकर्त्यांनी सोमवारी मातोश्रीवर उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत हातात भगवा घेत स्वत:ला शिवबंधनात अडकवून घेतले. दुपारी ४ वाजता या सर्वांनी मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश केल्याने खेडसह अवघ्या जिल्हाभरात खळबळ उडाली आहे, त्यामुळे खेडमध्ये आता मनसे नावापुरतीच उरली असल्याचे बोलले जात आहे.अचानक झालेल्या या पक्षप्रवेशाने सारेच अचंबित झाले असून, रामदास कदमांच्या या किमयेने मनसे पदाधिकाऱ्यांनाही बुचकाळ्यात टाकले आहे. याबाबत मनसेचे वैभव खेडेकर यांना विचारले असता त्यांनी हा प्रक्षप्रवेश खोटा असल्याचे सांगितले आहे. दोन-चार कार्यकर्ते शिवसेनेत गेल्याने मनसेचे फार काही बिघडणार नाही. त्याचा जे तळ्यात- मळ्यात होते, तेच दोन - चार कार्यकर्ते इकडे - तिकडे गेले असतील, त्याने मनसेला काही फरक पडत नाही. त्या किरकोळ गोष्टीचा बाऊ करण्यात आला असून, गेलेले कार्यकर्ते पैसे घेऊन गेल्याचे वैभव खेडेकर यांनी सांगितले. रामदास कदम यांच्या सांगण्यावरूनच मनसेचे हे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी पक्षप्रवेश केल्याचे समोर आले आहे. आगामी काळात दापोली अथवा गुहागर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या हेतूनेच रामदास कदमांनी ही खेळी केल्याचे राजकीय गोटातून बोलले जात आहे. याची पूर्वतयारी म्हणूनच रामदास कदमांनी मनसेला खिंडार पाडीत कासवगतीने पाऊल टाकायला प्रारंभ केला आहे. असे असले तरी मनसेच्या वैभव खेडेकर यांनी याबाबत सावध प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकाराची चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे. या प्रकाराने सेनेत जल्लेषाचे वातावरण आहे. महत्त्वाचा पक्ष प्रवेश खेड तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर येथे तो मनसेला बसलेला धक्का असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. मातोश्रीवर झालेल्या पक्षप्रवेशामुळे मनसेला खेडमध्ये बसलेला धक्का मोठा मानला जात आहे. मनसेचे संघटक असलेल्या वैभव खेडेकर यांच्या भागातील हा पक्ष प्रवेश असल्याने याबाबत राजकीय विश्लेषकांनी वेगवेगळे अर्थ लावायला सुरूवात केला आहे. निवडणूक पार्श्वभूमीवर ते महत्त्वाचे आहे.