शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनची पहिली राज्य कोअर कमिटी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:23 IST

रत्नागिरी : महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन अर्थात ‘मासू’ या अराजकीय विद्यार्थी संघटनेची पहिली राज्य कोअर कमिटी जाहीर झाली आहे. यात ...

रत्नागिरी : महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन अर्थात ‘मासू’ या अराजकीय विद्यार्थी संघटनेची पहिली राज्य कोअर कमिटी जाहीर झाली आहे. यात कोकण प्रदेशचे अ‍ॅड. गौरव देवेंद्र शेलार यांचा समावेश आहे.

महाराष्ट्रभर विद्यार्थ्यांचे न्याय हक्क आणि अधिकारांच्या पूर्ततेसाठी न्यायिक स्वरुपाचा लढा देण्याचं काम मासू करत असून, या लढ्याला व्यापक स्वरूप प्रदान करण्यासाठी तसेच संघटनेतील सदस्यांना निर्णय प्रकियेमध्ये सामील करून घेण्यासाठी संस्थापक अध्यक्ष यांच्या सूचनेनुसार राज्य कोअर कमिटी स्थापन करण्यात आली आहे. त्याकरिता राज्यभरातून पहिल्या कोअर कमिटीसाठी ७ सभासदांची निवड संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष अ‍ॅड. सुनील देवरे आणि उपाध्यक्ष प्रशांत जाधव यांनी केली आहे. संस्थापक अध्यक्ष व कार्याध्यक्ष आणि गव्हर्निंग कौन्सिलच्या इतर सभासदांच्या सहमतीने ही कमिटी जाहीर करण्यात आली आहे.

राज्य कोअर कमिटी सभासद शोधण्याची जबाबदारी संघटनेचे सचिव अरुण चव्हाण आणि राज्य संघटक सिद्धार्थ तेजाळे यांच्यावर सोपविण्यात आलेली होती. याकरिता सभासदांची कार्यक्षमता, विचार, आचार, संघटन कौशल्य व योग्यता ध्यानात घेऊन ही प्रक्रिया पार पाडण्यात आली आहे. यापुढे ही कमिटी वृद्धिंगत होणार असून, इतर सभासदांना त्यांच्या कामाच्या आधारावर राज्य कोअर कमिटीमध्ये सामील होण्याची संधी प्राप्त होणार आहे.

पहिल्या राज्य कोअर कमिटीत समावेश असलेले सात सदस्य असे : अ‍ॅड. गौरव शेलार (कोकण प्रदेश), प्रा. मो. वाजिद मोहम्मद इब्राहिम शेख (नांदेड विभाग, मराठवाडा), रोहन महाजन (जळगाव, उत्तर महाराष्ट्र), अ‍ॅड. करिष्मा अन्सारी (भिवंडी तालुका), चेतन विलास वासाडे (चंद्रपूर विभाग, विदर्भ), अ‍ॅड. स्नेहल निकाळे (मुंबई प्रदेश), परेश चौधरी (ठाणे जिल्हा).