शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI च्या विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
4
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
5
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
6
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
9
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
10
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
12
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
13
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
14
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
15
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
16
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
17
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
18
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
19
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
20
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊन, तरीही धोकादायक वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:31 IST

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा कहर अधिकच वाढत चालल्याने लॉकडाऊन करुनही वातावरण धोकादायक बनेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रत्यक्षात विचार ...

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा कहर अधिकच वाढत चालल्याने लॉकडाऊन करुनही वातावरण धोकादायक बनेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रत्यक्षात विचार करता, अशी परिस्थिती निर्माण व्हायला नको होती. मात्र, लॉकडाऊन करुनही परिस्थिती धोकादायक झाली असेल तर अजून प्रशासनाने काय-काय करायला पाहिजे, असे विचार मनात येतात. शासनाने लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने प्रशासन जोरदार प्रयत्न करत आहे. त्यासाठी पोलीस यंत्रणा रस्त्यावर उतरुन कडक उन्हामध्ये काम करत आहे. त्याला लोकांनी सहकार्य करण्याची अपेक्षा असते. मात्र, बाजारपेठेत काही दुकानदारांनी त्यालाही हरताळ फासला होता. अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त इतर दुकाने बंद असताना बाजारपेठेतील काही दुकानदारांनी केवळ दाखवायला शटर बंद करुन ग्राहकांना सेवा पुरवत होते. शटर उघडून दोन-चार ग्राहकांना सेवा देऊन ते बाहेर गेल्यावर पुन्हा खरेदीसाठी आणखी दोन-चार ग्राहकांना आतमध्ये घेत होत. हे काही दिवस सुरु होते. दरम्यान, प्रशासनाच्या ही बाब लक्षात आल्यानंतर अशा दुकानदारांवर कारवाई करण्यात आली होती. अत्यावश्यक सेवा सुरु असतानाच इतर व्यापाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष करुन आपल्या फायद्यासाठी प्रशासनाला वेठीस धरुन व्यवसाय सुरु ठेवणे, हे कितपत योग्य आहे.

लॉकडाऊनमुळे रत्नागिरी जिल्ह्यात कोणत्याही धार्मिक सभा, राजकीय सभा, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम, मिरवणुका, सर्व प्रकारची आंदोलने, माेर्चे यावर पूर्णत: बंदी घालण्यात आली आहे. तसेच शहरातले आणि ग्रामीण भागातील सर्वच आठवडा बाजार बंद करण्यात आले आहेत. शहर परिसरातील सर्व तलाव, स्वीमिंग पूल, क्रीडा व इतर स्पर्धांवर बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर शाळा, महाविद्यालये, खासगी क्लासेस, प्रशिक्षण संस्था आणि इतर शैक्षणिक कार्यक्रम यांच्यावरही प्रतिबंध घालण्यात आला आहे. असे असताना काही भागामध्ये फळ-भाजी विक्रेते फिरताना दिसत आहेत. तेही इतर व्यवसायांप्रमाणे बंद होणे आवश्यक आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या कालावधीत काहीजण त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते, ही बाब खेदजनक आहे.

कोरोना झपाट्याने वाढत असतानाच एकीकडे प्रशासन तळमळीने काम करत असतानाच त्याला लोकांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे. मात्र, परिस्थिती वेगळीच असल्याचे काही ठिकाणचे चित्र पाहिल्यास लक्षात येते. पोलीस बंदोबस्त असलेल्या ठिकाणी बंद असल्यागत वातावरण दिसते. इतर ठिकाणी पाहिल्यास त्याच्या विरुध्द चित्र पाहायला मिळते. त्यामुळे लोकांनी प्रशासनाला सहकार्य करण्यापेक्षा ते मनमानीपणे वागत असल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी लोक सर्रासपणे फिरताना दिसत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या संख्येत घट होण्यापेक्षा लक्षणीय वाढ होत असल्याचे दररोजच्या आकडेवारीवरुन स्पष्ट दिसून येते. लॉकडाऊनमुळे कोरोना रुग्णांची संख्या कमी व्हायला हवी होती. प्रत्यक्षात पाहिले तर कोरोनाबाधित रुग्णांसह बळी जाणाऱ्यांची संख्याही वाढतच चालली आहे. त्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत, याचा प्रत्येकाने गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. अन्यथा प्रत्येकाने कोरोनाचा बळी ठरण्यास तयार व्हावे, असेच म्हणावे लागेल. त्यासाठी या महामारीच्या दिवसात प्रत्येकाने प्रशासनाला सहकार्य करणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा कोरोनाचे संकट अत्यंत धोकादायक ठरणार आहे, याची प्रत्येकाने नोंद घेणे आवश्यक आहे.