शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

हसत-खेळत गणित शिकवणे गरजेचे

By admin | Updated: January 29, 2015 23:40 IST

रत्नागिरीत गणित अध्यापकांचे राज्यस्तरीय अधिवेशनाचे नगराध्यक्षांहस्ते उद्घाटन

रत्नागिरी : विद्यार्थ्यांसाठी गणित हा विषय कंटाळवाणा न होता हसत - खेळत, गाण्यातून व अधिक सोप्या पध्दतीने कसा शिकविता येईल, याबाबत गणित विषयाच्या शिक्षकांनी अधिक संशोधन करण्यावर भर द्यायला हवा, असे विचार महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळ संलग्न गणित अध्यापकांच्या ३८व्या राज्यस्तरीय अधिवेशनात आज मान्यवरांनी मांडले. येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालयात आयोजित या दोन दिवशीय अधिवेशनाचे उद्घाटन रत्नागिरीचे नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. विलास पाटणे होते. व्यासपीठावर महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळाचे अध्यक्ष डी. बी. टारे, कार्यवाह व्ही. एस. शिंदे, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) पवार व विज्ञान पर्यवेक्षक गाऊंड तसेच महामंडळाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रताप सुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते. नगराध्यक्ष महेंद्र मयेकर उद्घाटनपर भाषणात म्हणाले, गणित हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. मात्र, अनेकांना हा विषय कठीण जातो. त्यामुळे हा विषय अधिक सोपा करून, मनोरंजक पध्दतीने शिकवण्यावर भर देणे गरजेचे आहे. अध्यक्षीय भाषणात अ‍ॅड. पाटणे यांनीही गणित विषयाचे महत्त्व विषद केले. प्रास्ताविक प्रताप सुर्वे यांनी केले. सूत्रसंचालन इम्तियाज सिध्दिकी व अमोल टाकळे यांनी केले. उद्घाटनप्रसंगी गणितविषयक पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. उद्घाटनानंतरच्या सत्रात शास्त्रज्ञ डॉ. राजेंद्र कुंभार यांनी ‘गणित विषयाचे व्याकरण’ यावर मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात नितीन ओक यांनी मार्गदर्शन केले. उद्या (३० जानेवारी) राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा, माध्यमिक व उच्च माध्यमिक गणित यांचा सेतूबंध, शैक्षणिक साधन निर्मिती सादरीकरण, शंका समाधान असे कार्यक्रम होणार आहेत. तसेच गणित हा विषय अधिक सोपा बनविणारे पुणे येथील गणित तज्ज्ञ लक्ष्मण गोगावले यांचेही मार्गदर्शन होणार आहे. (प्रतिनिधी)