शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरण मोहिमेसाठी दि यश फाऊंडेशनच्या नर्सिंग कॉलेजचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:40 IST

रत्नागिरी : दिनांक १ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना कोविड लसीकरण करण्यात येणार आहे. त्याकरिता दि यश फाऊंडेशनचे ...

रत्नागिरी : दिनांक १ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना कोविड लसीकरण करण्यात येणार आहे. त्याकरिता दि यश फाऊंडेशनचे कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट डॉक्टर, प्रशिक्षित परिचारिकांसह ७ कर्मचारी प्रत्येक लसीकरण केंद्रावर पुरविण्याचे काम करण्यास सज्ज झाले आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. इंदुराणी जाखड, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांच्याकडे परिपूर्ण प्रस्ताव व्यवस्थापकीय विश्‍वस्त, माजी आमदार बाळ माने यांनी पाठवला आहे.

रत्नागिरीतील एकूण ३४ केंद्रांवर लसीकरण करण्याची यश फाऊंडेशनने तयारी केली आहे. रत्नागिरी नगर परिषदेच्या १८ प्राथमिक शाळांमध्ये लसीकरण करता येईल. रत्नागिरी शहरातील नगर परिषद शाळांनुसार गाडीतळ, घाणेकर आळी, टिळक आळी, पऱ्याची आळी, तेली आळी, पाटीलवाडी, गोखले नाका, चवंडेवठार, घुडेवठार, खेडेकरवाडी, धनजी नाका, मांडवी, बंदर रोड, खालची आळी, मुरुगवाडा, किल्ला, हनुमानवाडी, मिरकरवाडा, पोलीस हेडक्वार्टर, जुना माळनाका, विश्‍वनगर, अभ्युदयनगर, हिंदू कॉलनी, निवखोल, राजीवडा, कर्ला रोड, आंबेशेत, मुरुगवाडा, पंधरामाड, चर्मालय, कोकणनगर, साळवी स्टॉप, क्रांतीनगर, कोकणनगर, पोलीस चौकी परिसर, हयातनगर, कीर्तीनगर येथे लसीकरण केले जाईल.

तसेच शहराजवळील जाकिमिऱ्या, शिरगाव, सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट स्कूल - उद्यमनगर, मिरजोळे पाटीलवाडी, हनुमाननगर, खेडशी नाका, सेंट थॉमस स्कूल, कारवांचीवाडी, कुवारबाव उत्कर्षनगर, महालक्ष्मीनगर, नाचणे सह्याद्रीनगर, नाचणे क्रमांक १, कर्ला, भाट्ये अशा १६ शाळांमध्येही लसीकरण करण्याचा प्रस्ताव आहे.

रत्नागिरी शहर आणि आसपासच्या गावातील शाळांमधील या एकूण ३४ केंद्रांमध्ये १८ ते ४४ वयोगटातील सुमारे एक लाख पात्र लोकसंख्या आहे. लसीकरणाचे हे शिवधनुष्य सरकारच्या मदतीने तीन महिन्यांत पूर्ण करण्याचा संकल्प केला आहे. त्यामुळे प्रशासनाने प्रतिदिन ७ हजार लस पुरवाव्यात, अशी विनंती या प्रस्तावात केली आहे. तसेच जिल्हा लसीकरण अधिकाऱ्यांनी कोविन अ‍ॅप, पोर्टलवर या ३४ केंद्रांची नोंदणी करून द्यावी, म्हणजे पात्र नागरिकांना तत्काळ नोंदणी करता येईल.

..........................................

सातजणांची टीम काम करणार

लसीकरण केंद्रावर डॉक्टर, प्रशिक्षित परिचारिका, कॉम्प्युटर ऑपरेटर, लसीकरण अधिकारी २ अशी ७ जणांची टीम काम करेल. लस ठेवण्यासाठी लागणारा डीपफ्रिजर, आयएलआर, व्हॅक्सिन कॅरिअर, बर्फ यांची आवश्यकता आहे. याकरिता जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी परवानगी व प्रशिक्षण द्यावे. केंद्र सरकारने लसीकरणासाठी खासगी केंद्र देण्याची तयारी दर्शवली आहे.