शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सुंदर रत्नागिरीसाठी पुढाकार

By admin | Updated: July 18, 2015 00:15 IST

जाणीव, जायंट्सचा उपक्रम : संगोपन विनामूल्य करण्याचा संस्थांचा निर्धार

रत्नागिरी : स्वच्छ, सुंदर रत्नागिरीसाठी येथील जाणीव फाऊंडेशन आणि जायंट्स ग्रुप आॅफ रत्नागिरी या दोन सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला आहे. शहरातील साळवी स्टॉप ते जयस्तंभपर्यंत रस्त्याच्या दुभाजकामध्ये सुमारे २००० शोभिवंत झाडे लावून त्यांचे संपूर्ण संगोपन विनामूल्य करण्याचे ठरविले आहे. साळवी स्टॉप ते मारूती मंदिर या रस्त्यावरील दुभाजकावर जाणीव फाऊंडेशनने, तर मारूती मंदिर ते जयस्तंभ या रस्त्यावरील दुभाजकावर जायंटस् ग्रुप झाडे लावून त्यांचे संगोपन करणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांच्या हस्ते करण्यात आला. हा उपक्रम स्तुत्य असून, या झाडांचे विनामूल्य संगोपन करणार आहेत, याबद्दल नगराध्यक्षांनी गौरवोद्गार काढले.या उपक्रमासाठी नगरपरिषदेकडून २००० शोभिवंत झाडे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. दुभाजकामधील गवत काढून टाकण्यासाठी या दोन्ही संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी गेला आठवठाभर कंबर कसली होती. या उपक्रमाला नागरिकांचाही उत्तम सहभाग लाभत आहे. त्याचबरोबर येथील जिद्दी माऊंटेनिअरिंगचे अध्यक्ष धीरज पाटकर आणि त्यांचे सर्व पदाधिकारीही या उपक्रमात सहभागी झाले आहेत. दोन्ही संस्थांनी या लावण्यात येणाऱ्या झाडांच्या संगोपनाची जबाबदारी घेतली आहे. या उपक्रमात नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.या उपक्रमासाठी जाणीव फाऊंडेशनचे नीलेश मुळ्ये, उमेश महामुनी, संजय शिंदे, अमित सामंत, सुशील जाधव, विद्या गर्दे, वैशाली महामुनी, प्राजक्ता मुळ्ये, मंजिरी पटवर्धन तसेच जायंट्स ग्रुपचे भूषण मुळ्ये, श्रीकांत भिडे, दीपक देवल, धीरूभाई पटेल, महेश साठे, सुनील सहस्त्रबुद्धे, राजेश गांगण, शंकर स्वामी, प्रवीण डोंगरे तसेच जायंटस्चे युनिट संचालक संजय पाटणकर यांनी विशेष मेहनत घेतली. दोन्ही संस्थांतर्फे सतत विविध उपक्रम सुरू असतात. जायंट्स ही संस्थाही दरवर्षी विविध उपक्रम राबवीत असते. यावर्षीही संस्थेने ग्रामीण भागातील १००० विद्यार्थ्यांची मोफत रक्तगट तपासणी करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)दुभाजकात झाडे लावण्याचे काम सुरूसाळवी स्टॉप ते मारूती मंदिर या रस्त्यावरील दुभाजकामध्ये जाणीव फाऊंडेशनतर्फे १००० झाडे लावण्यात येणार आहेत, तर त्यापुढे म्हणजे मारूती मंदिर ते जयस्तंभ या रस्त्यावरील दुभाजकामध्ये जायंट्स ग्रुपतर्फे १००० झाडे लावण्यात येणार आहेत. या झाडांमधील साफसफाई, खत घालणे, पाणी घालणे व झाडांचे कटिंग करून आकार देणे, ही जबाबदारी दोन्हीही संस्था पेलणार आहेत.