शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिमा पूजनाने उत्तरकार्य; जोशींचे समाज प्रबोधनासाठी प्रयत्न सुरू

By admin | Updated: December 30, 2014 23:32 IST

ढवळ यांच्या कार्याला त्यांनी उजाळा देत त्यांच्या स्मृती जागविल्या

रत्नागिरी : व्यक्तीच्या निधनानंतर पिंडदानासारखे कुठलेही कार्य न करता केवळ त्याच्या प्रतिमा पूजनाने उत्तरकार्य करून समाजात खऱ्या अर्थाने समाजप्रबोधनाचा प्रयत्न प्रबोधनकार मारूतीकाका जोशी करीत आहेत. संगमेश्वर तालुक्यातील बहुजन विकास आघाडीचे सल्लागार सदस्य तुकाराम ढवळ यांचे नुकतेच निधन झाले. त्यांचे उत्तरकार्य मारूतीकाका जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बहुसंख्य समाजबांधव उपस्थित होते. जोशी यांनी कुटुंबियांना त्यांच्या प्रतिमेचे पूजन करायला लावले. यानंतर त्यांनी उपस्थितांना प्रबोधनपर मार्गदर्शन केले. ढवळ यांच्या कार्याला त्यांनी उजाळा देत त्यांच्या स्मृती जागविल्या. यावेळी उपस्थित जयराम रामाणे, नारायण भुरवणे, मधुकर बार्इंग, अमोल लाड, रावसाहेब शिवगण, अजय रामाणे, बविआचे सुरेश भायजे, शंकर लाड, डी. के. मांडवकर, दत्तराम जोयशी आदी मान्यवरांनीही आपल्या मनोगतातून जोशीकाकांचा हा उपक्रम स्तुत्य असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. कार्यक्रमाच्या शेवटी तुकाराम ढवळ यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. जोशी यांनी आतापर्यंत चिपळूण, संगमेश्वर, लांजा, राजापूर, रत्नागिरी या तालुक्यांमध्ये प्रतिमापूजनाने उत्तरकार्य करण्यासाठी प्रबोधनाचे कार्य करीत आहेत. हा त्यांचा ६०वा कार्यक्रम होता. या वयातही जिल्हाभर त्यांचे प्रबोधन सुरू आहे. विशेष म्हणजे संगमेश्वर तालुक्यातील कळंबस्ते, डिंगणी, कासारकोळवण, चोरवणे, रत्नागिरी तालुक्यातील खानू मठ, कशेळीकोंड, गावडेआंबेरे तसेच चिपळूण तालुक्यातील पिंपरी या गावांनी हा उपक्रम आपल्या गावात सुरू केला आहे.केवळ प्रतिमेचे पूजन करून उत्तरकार्य करून मारूतीकाका जोशी यांनी आपली परंपरा सुरू ठेवली आहे. समाजप्रबोधनासाठी हा पायंडा त्यांनी गेले काही वर्षे सुरू ठेवल्याबद्दल अनेकांनी कृतज्ञता व्यक्त केली. (प्रतिनिधी)