शहरं
Join us  
Trending Stories
1
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
2
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
3
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
4
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
5
“प्रियंका चोप्रामुळे राघव चड्ढा यांचा भाजपात प्रवेश”; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा मोठा दावा
6
धक्कादायक! नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, तरुणाला अटक
7
Budh Pradosh 2026: कर्जमुक्ती आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी २९ एप्रिलला न चुकता करा 'बुध प्रदोष' व्रत
8
Top Marathi News LIVE Updates: १ मेपासून मराठीची मोहीम सुरूच राहणार; मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
9
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
10
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
11
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
12
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदी सिक्कीमच्या तरुणांसोबत खेळले फुटबॉल, PHOTOS ची रंगली चर्चा
13
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
14
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
15
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
16
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
17
‘RTE’ प्रवेश! पसंतीच्या शाळेसाठी पालकांची कोंडी; ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ, तरीही संभ्रम कायम
18
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
19
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
20
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शिवतरच्या नशिबी दुर्लक्षच

By admin | Updated: October 13, 2015 00:12 IST

खेड तालुका : राज्य सरकारच्या पुढाकाराची गरज

श्रीकांत चाळके-- खेड--पहिल्या आणि दुसऱ्या महायुध्दामध्ये धारातिर्थी पडलेल्या शिवतर येथील २३४ जवानांच्या स्मरणाचा राज्य सरकारला विसर पडला आहे़ या गावातील धारातिर्थी पडलेल्या जवानांचे स्मरण व्हावे म्हणून इंग्रज सरकारने या गावामध्ये उभारलेला रणस्तंभ हाच या कर्तबगार जवांनाच्या शौर्याची साक्ष देत आहे़ शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दोन वर्षांपूर्वी दिलेल्या १५ लाख रूपये खर्चातून या रणस्तंभाची डागडुजी करण्यात आली. याकरिता रामदास कदम यांनीच विशेष प्रयत्न केले होते. दोन्ही युध्दामध्ये अतुल शौर्य दाखविणारा शिवतर गाव तसा विविध सुविधांपासून वंचितच राहिला आहे. या गावाला फौजी गावचा दर्जा मिळाल्यास हा गाव सुजलाम् सुफलाम् होणार आहे़ मात्र, याकामी आता राज्य सरकारनेच पुढाकार घेतल्यास दोन्ही युध्दामध्ये रक्त सांडलेल्या जवानांनी केलेल्या प्रयत्नांचे खऱ्या अर्थाने चीज होणार आहे़ या गावातील आजी आणि माजी जवानांनी शिवतर गावाला केंद्राकडून निधी प्राप्त होण्यासाठी वारंवार प्रयत्न केले आहेत़ मात्र, त्यामध्ये त्यांना यश आले नाही़ आतापर्यंतच्या सर्वच आमदार तसेच लोकप्रतिनिधींनी आणि समाजोपयोगी कामाचा टेंभा मिरवणाऱ्यांनी याकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष केले असल्याचे दिसून येत आहे. येथील रणस्तंभ हाच येथील जवानांच्या पराक्रमाची साक्ष देत उभा आहे़ हा रणस्तंभदेखील दुर्लक्षित होता. मात्र, रामदास कदम यांनी दिवंगत सैनिकांच्या अतुल शौर्याला सलाम करीत मातृभूमीप्रती दाखवलेल्या औदार्याबद्दल येथील जवान कृतार्थ झाले आहेत. आता दुर्लक्षित राहिलेल्या शिवतर गावचे ‘फौजी शिवतर’ असे नामकरण करण्यासाठी प्रयत्न करावे, असे या जवानांना वाटते. राज्य सरकारने याकडे कटाक्षाने लक्ष घालावे, अशी मागणीदेखील यानिमित्ताने या जवानांनी केली आहे. शिवतर गाव हा संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यासह महाराष्ट्राची शान आहे. संपूर्ण भारतात शिवतर गावाची फौजी म्हणूनच स्वतंत्र ओळख आहे़ ब्रिटिशांच्या काळात याच गावातील शेकडो जवांनानी आपल्या मातृभूमीप्रती बलिदान दिले आहे. महाराष्टा्रतील एवढ्या मोठ्या प्रमाणात बलिदान दिलेल्या जवानांचे हे एकमेव गाव आहे. मात्र, या बदल्यात गावामध्ये माजी सैनिकांच्या तसेच त्यांच्या पाल्यांच्या कल्याणार्थ कोणतीही विकासकामे झाली नाहीत. जवानांसाठी आरोग्यदृष्ट्या कोणतीही सुविधा या सैनिकांच्या गावामध्ये उपलब्ध नाही. शिक्षण आणि सामाजिक बांधिलकीपासून हे गाव अद्याप कोसो अंतर दूर आहे. खेड शहरापासून १३ किलोमीटर अंतरावर असलेले हे गाव आजही अत्यावश्यक सुविधांच्या प्रतीक्षेत आहे़ याकरिता आता राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.मागणी : ‘फौजी शिवतर’चा प्रस्तावरायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील आंबवडे गावाचे नुकतेच ‘फौजी आंबवडे’ असे नामकरण करून भारत सरकारने येथील धारातिर्थी पडलेल्या जवानांना दोन वर्षांपूर्वी न्याय मिळवून दिला आहे़ याच धर्तीवर शिवतर गावाचे ‘‘फौजी शिवतर’’ असे नामकरण करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे़ अपुरी माहितीरणस्तंभावर २३४पैकी केवळ १८ जवानांची नावे आहेत़ उर्वरित जवानांची येथील सैनिकांच्या नातेवाईकांना अद्याप माहिती नाही.