शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

जून महिन्यात सापडले सर्वाधिक १६,६९२ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:22 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात जून महिन्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून, महिनाभरात १६,६९२ रुग्ण सापडले आहेत. लॉकडाऊन असतानाही जिल्ह्यात एवढ्या माेठ्या ...

रत्नागिरी : जिल्ह्यात जून महिन्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून, महिनाभरात १६,६९२ रुग्ण सापडले आहेत. लॉकडाऊन असतानाही जिल्ह्यात एवढ्या माेठ्या प्रमाणात रुग्ण आढळल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. तर मृत्यू मे महिन्यापेक्षा कमी असून ४६१ रुग्णांचा झाला आहे.

कोरोनामुळ जिल्ह्यातील जनजीवनावर फार मोठा परिणाम झाला आहे. राज्यात लागू झालेल्या नियमांनुसार अत्यावश्यक कामाशिवाय सर्वांनी घरी बसणे सक्तीचे करण्यात आले होते. नागरिकांची उपासमार होऊ नये, यासाठी अत्यावश्यक सेवेशिवाय कोणतेही दुकान उघडे ठेवण्यात आले नव्हते. जिल्ह्यात लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. मात्र, हे लॉकडाऊन सुरू असले तरी त्याचा परिणाम ग्रामीण भागात फारसा जाणवत नव्हता. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार उडाला होता. आजही ग्रामीण भागात बाधित रुग्णांची संख्या शहरी भागापेक्षा जास्त आहे.

दरम्यान, जिल्ह्यात कोरोनाचा कहर अजूनही सुरूच असून मागील सव्वा वर्षातील जून महिन्यात सापडलेले कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या ही सर्वात जास्त १६,६९२ रुग्ण आहेत. मार्च महिन्यामध्ये अचानक कोरोनाबाधितांची संख्या वाढली. तोपर्यंत चालू वर्षाच्या जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाला होता. मार्च महिन्यापासून कोरोनाबाधित रुग्णांनी उच्चांक गाठला. गेल्या चार महिन्यात ५३,१३१ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे ८० टक्के रुग्ण हे या चार महिन्यातील आहेत. कोरोना रुग्णांची वाढती संख्या कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ८ दिवसांचे कडक लॉकडाऊन केले. तरीही रुग्णसंख्या कमी झालेली नसून रुग्णसंख्या वाढलेली आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी आरोग्य यंत्रणा दिवस-रात्र मेहनत घेत आहे.

--------------------

महिना बाधित रुग्ण मृत्यू पावलेले रुग्ण

मार्च ११,०२९ ९

एप्रिल ११,२५४ ८०

मे १४,१५६ ५८३

जून १६,६९२ ४६१

----------------

डेल्टा प्लसचाही धाेका

मे, जून महिन्यात कोरोनाची रुग्ण संख्या कमी होण्याचे नाव घेत नसतानाच रत्नागिरी जिल्ह्यात डेल्टा प्लस विषाणूने एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. जिल्ह्यात डेल्टा प्लसचे ९ रुग्ण सापडले होते. त्यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला असून डेल्टा प्लसने मृत्यू झालेली वृद्धा ही राज्यातील पहिला बळी होती. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे ठाकले होते. त्यामध्ये ते ८ रुग्ण बरे झाले. ज्या परिसरात हे रुग्ण सापडले त्या संगमेश्वर तालुक्यातील ५ गावे प्रतिबंधात्मक क्षेत्र जाहीर करण्यात आली होती.

--------------

बालकांनाही काेराेनाची लागण

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात संसर्ग वाढलेला असतानाच बाधितांच्या संख्येत बालकांचीही भर पडली होती. एप्रिल आणि मे महिन्यात २,९०८ बालकांना कोरोनाची लागण झाली होती. जून महिन्यात वाढलेल्या कोरोना संसर्गामध्ये किती बालकांना लागण झाली, हे अजून समजू शकलेले नाही. मात्र, संसर्ग जास्त वाढल्याने बालकांची संख्याही जास्त असणार, हे निश्चित आहे.