शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

वित्त आयोगाचा निधी निविदांअभावी ठप्प

By admin | Updated: December 12, 2015 00:19 IST

लांजा पंचायत समिती : विकासकामांबाबत सभेत चर्चा

लांजा : तेराव्या वित्त आयोगाचा शंभर टक्के निधी खर्च झाला पाहिजे. त्यासाठी पंचायत समिती व ग्रामपंचायतस्तरावर निविदा काढून विंंधन विहिरींचे प्रस्ताव त्वरित द्यावेत. शेतकऱ्यांना आंबा नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी, असा महत्वपूर्ण ठराव लांजा पंचायत समितीच्या मासिक सभेत करण्यात आला.या मासिक सभेत विविध विकासकामांबाबत चर्चा करून काही महत्वपूर्ण ठराव करण्यात आले. या सभेला सभापती दीपाली दळवी, उपसभापती आदेश आंबोलकर, पंचायत समिती सदस्य चंद्रकांत मणचेकर, युवराज हांदे, लक्ष्मण मोरये, लिला घडशी, प्रियांका रसाळ, गटविकास अधिकारी परब, गटशिक्षणाधिकारी विनोद सावंग यांच्यासह विविध खात्यांतील प्रमुख अधिकारी उपस्थित होते.यावेळी बांधकाम विभागावर चर्चा करताना स्थानिक विकास व डोंगरी विकास योजनेतील मंजूर झालेल्या कामांची निविदा अद्याप काढण्यात आलेली नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावर तेराव्या वित्त आयोगाचा निधी अद्याप खर्च झाला नसल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. यावर बोलताना सभापतींनी सांगितले की, या सर्व कामांच्या निविदा काढून डिसेंबरपर्यंत सर्व निधी खर्च झाला पाहिजे, असे संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले.ग्रामीण पाणी पुरवठा विभागावर चर्चा करताना यावर्षी कमी पाऊस पडला असल्याने तालुक्यामध्ये पाणीटंचाई अधिक उद्भवण्याची शक्यता पंचायत समिती सदस्य लक्ष्मण मोरये यांनी व्यक्त केली. यावर संबंधित विभाकडून विस्तृत माहिती घेण्यात आली. त्यानंतर पाणीटंचाईवर मात करण्यासाठी गावनिहाय विंधन विहिरींचे प्रस्ताव मागवून त्यांचाही आराखड्यामध्ये समावेश करण्याची सूचना करण्यात आली. तालुक्यात लोकसहभागातून जास्तीत जास्त बंधारे बांधून घ्यावेत तसेच ज्या ज्या गावामध्ये पाणीटंचाईची शक्यता आहे, त्या ठिकाणच्या ग्रामपंचायतीने टँकर मागणीचे प्रस्ताव पंचायत समितीकडे पाठवावेत, अशी सूचनाही यावेळी अधिकाऱ्यांना देण्यात आली. शिक्षण विभागावर चर्चा करताना काही ठिकाणी पोषण आहाराचे धान्य योग्यरित्या ठेवले जात नसल्याचे सांगण्यात आले. यावर बोलताना सभापती दीपाली दळवी यांनी सांगितले की, मुलांच्या पोषण आहाराच्या धान्यामध्ये हलगर्जीपणा अजिबात खपवून घेतला जाणार नाही. पोषण आहाराचे धान्य सुरक्षित ठेवण्यात आले आहे की नाही, याची पाहणी अधिकाऱ्यांनी करावी. याबाबतचा अहवाल त्वरित द्यावा, त्याचबरोबर नादुरुस्त अंगणवाडी इमारतीमध्ये मुलांना बसवू नये. विद्यार्थांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावा. तालुक्यातील नादुरूस्त शाळा व अंगणवाड्यांची माहिती घेऊन त्या दुरुस्त करण्याचा व काही ठिकाणी नवीन वर्गखोल्या घेण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. तालुक्यातील मुलींसाठी मोफत एमएससीआयटी प्रशिक्षण, संगणक दुरूस्ती प्रशिक्षण व किशोरवयीन मुलींसाठी आरोग्यविषयक मार्गदर्शन अशा योजना पंचायत समितीस्तरावर राबवण्याचे निश्चित करण्यात आले.आरोग्य विभागावर चर्चा करताना जलशुध्दिकरणावर जास्त भर देण्यात आला. मेडिक्लोरसारखी औषधे पंचायती समितीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तसेत पल्स पोलिओ मोहीमसुध्दा राबवण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी आरोग्य विभागातील अनेक पदे रिक्त असल्याचा प्रश्न पंचायत समिती सदस्य चंद्रकांत मणचेकर यांनी उपस्थित केला. आरोग्य विभागातील रिक्त पदे त्वरित भरून घेण्यासंदर्भात ठराव करण्यात आला. (प्रतिनिधी)सभेत मंजुरी : साहित्य खरेदीचा विषयशेतकऱ्यांना सबसिडीतून भाजीपाला बियाणे, कृषी साहित्य, आंबा व काजू फवारणीसाठी औषधे, सौरकंदील, अपंगांसाठी घरघंटी, मागासवर्गीयांसाठी सौर पथदीप व निकषांमध्ये बसणाऱ्या बायोगॅससाठी साहित्य खरेदी करण्यास या सभेमध्ये मंजुरी देण्यात आली.अधिकाऱ्यांना सूचनाशेतीपंपाची कनेक्शन्स त्वरित द्यावीत, गंजलेले व धोकादायक पोल बदलण्यात यावेत, जनावरांना पायलागाची लस देण्यात यावी याबाबत सूचना दिल्या.तेराव्या वित्त आयोगाचा निधी खर्च झाला पाहिजे.विंधन विहिरींचे प्रस्ताव त्वरित द्यावेत.महत्त्वाच्या विषयांवर मासिक सभेत ठराव.पोषण आहाराबाबत सूचना.