शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

माडी विक्री बंद झाल्याने व्यावसायिकांवर आर्थिक संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:21 IST

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक व्यवसाय कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बंद ठेवण्यात आले आहेत. माडी व्यवसायही बंद ठेवण्यात आल्याने ...

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक व्यवसाय कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बंद ठेवण्यात आले आहेत. माडी व्यवसायही बंद ठेवण्यात आल्याने या व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यामुळे किरकोळ माडी विक्री व्यवसायाला पार्सल स्वरुपात सुरु करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी रत्नागिरी जिल्हा माडी व्यावसायिक संघाकडून करण्यात आली आहे. या आशयाचे निवेदन गुरूवारी जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की, रत्नागिरी जिल्ह्यातील किरकोळ माडी विक्री व्यवसाय कोरोना प्रादुर्भावामुळे १५ एप्रिलपासून शासनाच्या आदेशानुसार बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे हे व्यावसायिक आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील माडी व्यवसाय करणारा वर्ग उदरनिर्वाहाचे साधन नसल्यामुळे बेरोजगार अवस्थेत घरीच बसून आहे. त्यामुळे शेकडो कुटुंबांवर उपासमारीची वेळ आलेली आहे.

त्यातच शासनाने सप्टेंबर २०२० ते ऑगस्ट २०२१पर्यंत १२ महिन्यांची आगाऊ बीड रक्‍कम नूतनीकरण पध्दतीने माडी दुकानाची फी भरुन घेतलेली आहे. एप्रिल २०२१च्या सुरुवातीपासून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने कोरोना प्रादुर्भावामुळे सुमारे ३ महिने व्यवसाय बंदस्थितीत आहे. माडी व्यवसाय सुरु करण्यासाठी व्यावसायिकांनी बँकेकडून व पतसंस्थेकडून कर्ज घेतलेले आहे. माड़ी व्यवसाय सुरु नसल्यामुळे गेले २ महिने कर्जाचे हप्ते माडी व्यावसायिक भरु शकलेले नाहीत.

या व्यावसायिकांनी केरळ, तामिळनाडू या परराज्यातून माडी उत्पादनासाठी मजूर आणलेले आहेत. माडी विक्री व्यवसाय करण्यासाठी माडी दुकानांची जागा कराराने भाड्याने घेण्यात आलेल्या आहेत. त्यासाठी आगाऊ रक्‍कम जागा मालकांना डिपॉझिट म्हणून देण्यात आलेली आहे. माडाची झाडे एक वर्षांची रक्कम भरुन कराराने खरेदी केलेली आहेत. त्यामुळे हे व्यावसायिक कर्जाची रक्‍कम कशी भागवणार, या विवंचनेत सापडलेले आहेत. तसेच स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करणार, ही चिंता आहे.

या सर्व अडचणींचा विचार करून शासनाने किरकोळ माडी विक्री व्यवसाय पार्सल स्वरुपात सुरु करण्यासाठी लवकरात लवकर परवानगी दयावी, अशी मागणी रत्नागिरी जिल्हा माडी व्यावसायिक संघाने केली आहे.