शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
4
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
5
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
6
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
7
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
8
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
9
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
10
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
11
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
12
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
13
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
14
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
15
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
17
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
18
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
19
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
20
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
Daily Top 2Weekly Top 5

यंदा उत्पादन घटण्याची भीती

By admin | Updated: July 3, 2014 00:35 IST

शास्त्रज्ञांचा अंदाज : उगवलेली रोपे करपण्याची शक्यता

दापोली : राज्यभरात मान्सूनने दडी मारल्याने दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. कोकणात दुबार पेरणीचे संकट नसले तरी जून महिन्यात पाऊस कमी प्रमाणात पडल्याने पेरणी व भातलावणी उशिरा झाल्याने कोकणातील भातपिकाच्या उत्पादनात घट होऊ शकते, अशी भीती डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.कोकणात मोठ्या प्रमाणात पडणाऱ्या पावसामुळे भातशेतीचे उत्पादन घेतले जाते. कोकणात दरवर्षी सरासरी ३ हजार मिलिमीटर पाऊस पडतो. त्यापैकी जवळजवळ १ हजार मिलिमीटर पाऊस जून महिन्यात पडतो. परंतु यावर्षी पावसाने मारलेल्या दडीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे.भातपेरणी झाल्यानंतर सुमारे ३ ते ४ आठवड्यात भात रोपांची लागवड करावी लागते. परंतु कमी पावसामुळे रोपांची वाढ झालेली नाही. त्याचबरोबर रोपांची योग्य पद्धतीने वाढ न झाल्याने पेरणी होऊनही रोपे लागवडीसाठी तयार नाहीत. त्याचबरोबर पाऊस नसल्याने भात लागवड वेळेत न झाल्याने भात पिकांचा कालावधी वाढण्याची शक्यता आहे.भात लागवड उशिरा झाल्यास दुबार पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना उशीर होऊन त्याचा परिणाम दुबार पिकावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकणातील शेतकऱ्याला प्रत्यक्ष फटका बसणार नसला तरीही भातपिकाच्या उत्पन्नावर त्याचा परिणाम होणार असल्याने शेतकऱ्यांना यंदा आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागणार आहे.कोकणातील भातशेती अपुऱ्या पावसामुळे संकटात सापडली. पावसाने दडी मारल्याने लावणीची कामे रखडली आहेत.त्याचबरोबर भातपिकावर लष्करी आळीसारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांसमोर संकट उभे राहिले आहे. रोपावरील रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी बुरशीनाशके फवारण्याचा सल्ला विद्यापीठाकडून देण्यात आला असून, गेल्या कित्येक वर्षापासून पहिल्यांदाच जून महिन्यात कमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. (प्रतिनिधी)