शहरं
Join us  
Trending Stories
1
'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून कसलीही चर्चा झाली नाही'; भारताने दावा फेटाळला, अमेरिकेच्या अध्यक्षांची 'पंचाईत'
2
'स्वतःच्या अपयशांसाठी शेजाऱ्यांना दोष देणे पाकिस्तानची जुनी सवय', अफगाण-पाक संघर्षावरुन भारताचे टीकास्त्र
3
कर्मचारीच द्यायचा टिप, मग फ्लिपकार्टच्या ट्रकमधील वस्तूंवर मारायचे डल्ला, ७ जण अटकेत, २२६ मोबाईल जप्त  
4
रणजी ट्रॉफी स्पर्धेत 'जर्सी' चित्रपटाचा ट्रेलर! मुंबईकरांवर भारी पडला जम्मू-काश्मीरचा ४० वर्षीय कॅप्टन
5
डीएसएलआर कॅमेऱ्याला टक्कर देणारी ओप्पो फाइंड एक्स ९ सीरीज लॉन्च; जाणून घ्या किंमत!
6
सलग दुसऱ्या सेंच्युरीसह एलिसा हीलीनं पा़डला बांगलादेशचा बुक्का; ऑस्ट्रेलियाला मिळालं सेमीचं पहिलं तिकीट
7
Gujarat Cabinet Resignation: भाजपने गुजरातमधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे का घेतले, आता पुढे काय घडणार?
8
टी-२० विश्वचषक २०२६ साठी पात्र ठरलेले सर्व २० संघ कोणते? येथे पाहा संपूर्ण यादी
9
वापरली अशी ट्रिक आणि दोन वर्षे फ्रीमध्ये ऑनलाइन ऑर्डर केलं जेवण, बिंग फुटताच...   
10
"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
11
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
12
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
13
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
14
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले
15
Bogus Voter: 'त्या' घरात ८०० नव्हे, पाचच सदस्यांचे वास्तव्य; जयंत पाटील यांच्या आरोपात किती सत्यता? काय आढळलं?
16
Video - ऑनलाईन ऑर्डर केलं फूड; डिलिव्हरी बॉयची अवस्था पाहून डोकंच फिरेल, दारू पिऊन...
17
RCB फॅन्स... सावधान!! विराट कोहली IPL मधून निवृत्त होणार? 'या' घटनेमुळे चर्चांना उधाण
18
खेडेगावातील लोकांसाठी परवडणाऱ्या बाईक्स, किंमत ५५ हजारांपासून सुरू; येथे पाहा संपूर्ण लिस्ट
19
Gujarat Cabinet: मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळातील १६ मंत्र्यांनी दिला राजीनामा, गुजरातमध्ये मोठी राजकीय घडामोड
20
"मला सुटी नको, WFH द्या..."; आईच्या अपघातानंतर तरुणीची विनंती, कंपनीचा पुरावे मागत नकार

कोकणात पर्यावरणपूरकच प्रकल्प - उपमुख्यमंत्री अजित पवार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 17:12 IST

रत्नागिरीत १९७ कोटींचे कौशल्यवर्धन केंद्र

रत्नागिरी : उद्योगांना बळकटी देणाऱ्या योजना अर्थसंकल्पात जाहीर केल्या आहेत. राज्यात, जिल्ह्यात जे प्रकल्प होत आहेत अशा प्रकल्पांना राज्य सरकारकडून निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही देतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पर्यावरणाचा ऱ्हास होईल असे प्रकल्प कोकणात होऊ देणार नाही असे ठामपणे सांगितले.सध्याचे युग तंत्रज्ञानाचे युग असून, त्यामध्ये बदल होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वत:ला घडवताना तांत्रिक व व्यवसाय प्रशिक्षण घेणे काळाची गरज आहे. या संकल्पनेतूनच काैशल्यवर्धक केंद्राची रत्नागिरीत उभारणी केली जात आहे. चंद्रपूर, गडचिरोली व त्यानंतर रत्नागिरी शहरात हे केंद्र सुरू होणार आहे. याचे श्रेय पालकमंत्री उदय सामंत यांना आहे. सध्या कुशल मनुष्यबळाची गरज असून, ही गरज काैशल्यवर्धन केंद्रामुळे पूर्ण होणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.टाटा उद्योग समूह व एमआयडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी शहरातील चंपक मैदान येथे टाटा संचलित काैशल्यवर्धन केंद्राचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या उद्घाटनानंतर आयाेजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत, खासदार सुनील तटकरे, आमदार शेखर निकम, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक धनजंय कुलकर्णी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, टाटा उद्योग समुहाचे कुणाल खेमनार, अनिल केलापुरे उपस्थित होते.उपमुख्यमंत्री पवार पुढे म्हणाले की, रत्नागिरी शहरात १९७ कोटींचे काैशल्यवर्धन केंद्र उभारत असून, लवकरात लवकर ते पूर्ण होईल. या प्रकल्पामुळे शहर व आसपासच्या तालुक्यांत सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांना फायदा होणार आहे. अत्याधुनिक प्रशिक्षणामुळे राेजगार, नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. अभियांत्रिकी, रासायनिक, फळप्रक्रिया उद्योगांना मनुष्यबळाची उपलब्धता होईल, असेही ते म्हणाले.मंत्री सामंत म्हणाले की, काैशल्यवर्धन केंद्रामुळे रत्नागिरीतील विद्यार्थी रत्नागिरीतच शिकून रोजगार किंवा व्यावसायिक व्हावा, अशी अपेक्षा आहे. हे केंद्र वर्षभरात विद्यार्थ्यांसाठी खुले करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.

खासदार सुनील तटकरे यांनी काैशल्यवर्धक केंद्रामुळे रत्नागिरी शहर राज्यातच नव्हे तर देशातही महत्त्वाचं शहर म्हणून ओळखलं जाईल, असे सांगितले. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी या काैशल्य केंद्रामुळे चांगल्या दर्जाच्या नोकरीची, व्यवसायाची संधी प्राप्त होणार असल्याचे सांगितले.

महामार्गाच्या कामासाठी पाठपुरावामुंबई-गोवा महामार्गाच्या कामाबाबत पाठपुरावा करून लवकरात लवकर ताे पूर्ण करणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. तसेच विमान, जल, रस्ते विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAjit Pawarअजित पवारenvironmentपर्यावरण