शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांसाठी काेराेना ड्युटीचा कालावधी दहा दिवसांचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:22 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क टेंभ्ये : कोरोना संदर्भातील ड्युटीचा कालावधी हा जास्तीत जास्त दहा दिवसांचा असणार आहे. तसेच माध्यमिक शाळांचे ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

टेंभ्ये : कोरोना संदर्भातील ड्युटीचा कालावधी हा जास्तीत जास्त दहा दिवसांचा असणार आहे. तसेच माध्यमिक शाळांचे दैनंदिन कामकाज सुरू झाल्यामुळे माध्यमिक शिक्षक व कर्मचाऱ्यांना कोविड ड्युटी देण्यात येऊ नये, अशी मागणी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक संघटनेच्या समन्वय समितीतर्फे करण्यात आली आहे. या संदर्भातील विनंतीपत्र शिक्षणाधिकारी व समन्वय समितीतर्फे जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार आहे.

रत्नागिरी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक संघटना समन्वय समितीची शिक्षणाधिकारी माध्यमिक निशादेवी वाघमोडे यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीमध्ये माध्यमिक शिक्षण विभागामध्ये प्रलंबित असणाऱ्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. सर्व प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी शिक्षण विभाग विशेष प्रयत्न करणार असल्याचे शिक्षणाधिकारी वाघमोडे यांनी सांगितले.

या बैठकीत सुरुवातीला समन्वय समितीचे सचिव सागर पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले व सभेचे प्रास्ताविक केले. यावेळी उपशिक्षणाधिकारी नरेंद्र गावंड, गोपाळ चौधरी व अधीक्षक चौगुले उपस्थित होते. समन्वय समितीचे अध्यक्ष विजय पाटील, उपाध्यक्ष प्रदीप वाघोदे, सहसचिव गजानन पाटणकर यांच्यासह समन्वय समितीच्या सर्व सदस्यांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला. कोविड संदर्भातील कामकाज सुरू असणाऱ्या माध्यमिक शाळांना ‘वर्क फ्रॉम होम’चे आदेश दिले असून, आवश्यक असल्यास माध्यमिक शाळेशेजारील प्राथमिक शाळेची इमारत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी ३ मे २०२१च्या शासन निर्णयानुसार उपस्थितीबाबत अंमलबजावणी केली जाणार आहे. शिक्षण विभागातर्फे उपशिक्षणाधिकारी गोपाळ चौधरी व समन्वय समितीतर्फे सचिव सागर पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.

चार ते सहा आठवड्यांत प्रकरण निकाली काढा

माध्यमिक शिक्षण विभाग कार्यालयांमध्ये प्रलंबित असणाऱ्या वरिष्ठ श्रेणी, निवड श्रेणी, मुख्याध्यापक मान्यता, स्वाक्षरी अधिकार, वैद्यकीय देयके, सेवानिवृत्त प्रकरणे यासह सर्व प्रलंबित प्रकरणे लवकरात लवकर निकालात काढण्याच्या अनुषंगाने कार्यालयातील कर्मचाऱ्यांना विशेष सूचना दिल्या जाणार आहेत. तसेच प्रकरण दाखल झाल्यापासून चार ते सहा आठवड्यांत ते निकालात काढण्यात येणार आहे व प्रलंबित प्रकरणांची यादी समन्वय समितीकडे देण्यात येणार आहे.

------------------------------

निवड श्रेणीची प्रकरणे निकाली काढणार

वरिष्ठ अथवा निवड श्रेणी प्रस्तावासोबत संस्थेचा अद्ययावत पीटीआर जोडणे आवश्यक नाही. शाळास्तरावर वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी पात्र शिक्षकांची यादी प्रसिद्ध करून ती यादी शिक्षण विभागाकडे जमा करण्याबाबत आदेश देण्यात येणार आहेत. नियमाप्रमाणे असणारी सर्व वरिष्ठ व निवड श्रेणीची प्रकरणे तत्काळ निकालात काढण्यात येणार आहेत.

---------------------------------

शाळांमध्ये पन्नास टक्के उपस्थिती

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या निकालासंदर्भातील कामकाज पूर्ण झालेल्या शाळांमधील कर्मचाऱ्यांसाठी पन्नास टक्के उपस्थितीचे धोरण लागू करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाप्रमाणे वीकेंड लॉकडाऊन माध्यमिक शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांसाठी लागू आहे.