शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
4
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
5
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
7
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
8
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
9
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
10
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
11
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
12
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
13
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
14
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
15
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
16
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
17
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
18
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
19
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
20
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी यंदा माशांचा पाळणा लांबण्याची भीती!

By admin | Updated: July 8, 2014 00:19 IST

मच्छीमारांनाही फटका

मेहरुन नाकाडे : रत्नागिरी, पावसाने पाठ फिरवल्याने केवळ शेतकऱ्यांनाच नव्हे तर मच्छिमारांनाही मोठा फटका बसण्याची भीती आहे. पाऊस कमी झाल्याने यंदा पावसाळ्यातही तापमान वाढले आहे. त्यामुळे मच्छीच्या प्रजननासाठी मोठा धोका निर्माण झाला आहे. पाऊस उशिराने सुरू झाल्याने हा काळ लांबण्याची शक्यता आहे आणि जर पाऊस कमी झाला तर मत्स्य प्रजननच खूप कमी प्रमाणात होण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे. यंदा उशिराने सुरू झालेल्या पावसाचा परिणाम शेतीवर झाला आहेच, पण त्याचबरोबर मत्स्योत्पादनावरही त्याचा विपरित परिणाम होऊ लागला आहे. पावसाळा हा माशांचा प्रजननाचा हंगाम असतो. त्यामुळे नारळी पौर्णिमेनंतर मासेमारी सुरू होते. जून ते आॅगस्ट या तीन महिन्यांत समुद्राच्या पाण्याचे तापमान बदलते. यावेळी पृष्ठभागावरचे थंड पाणी तळाशी जाते व तळातील उष्ण पाणी वरती येते. याचदरम्यान माशांसाठी पोषक द्रव्ये पृष्ठभागावर येतात. माशांच्या पिलांसाठी प्लवंग (खाद्य) तयार होतं. पावसाळ्यातील थंडगार वारे, पावसाचे तुषार, जोरदार येणाऱ्या लाटा हे वातावरण माशांच्या प्रजननासाठी पोषक ठरतं. परंतु पाऊस नसल्यामुळे वातावरणात कमालीचा बदल झाला असून उष्णता वाढली आहे. समुद्री भागात तर ही उष्णता जास्तच आहे. उष्णतेमुळे समुद्राच्या पृष्ठभागावरही गरम पाणी असतं, रात्रीच्या वेळी तापमान खाली आल्यावर पाणी थंड होतं. त्यामुळे माशांच्या प्रजननकाळासाठी पोषक वातावरण अजूनही निर्माण झालेले नाही. किनारपट्टीवरील कांदळवन, खाजण भागात मासे अंडी घालतात. नदीनाल्याच्या पाण्यातून वाहत येणारे क्षारयुक्त पाणी माशांसाठी खाद्य तयार होते. मात्र, पाऊस जोरदार पडत नसल्यामुळे माशांना व पिलांना आवश्यक ते खाद्य उपलब्ध होत नाही. याचा परिणाम माशांच्या प्रजननावर होणार आहे. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची भीती आहे. पाऊस उशिरा झाला, तर प्रजननाचा काळ लांबण्याची शक्यता आहे.नदीपात्रातील पाणीदेखील अद्याप कमी आहे. नदीच्या पात्रातही हीच प्रक्रिया होते. पावसाचे तुषार झेलण्यासाठी मासे उथळपात्रात येतात. मात्र, उष्णतेमुळे पाण्याच्या तापमानात वाढ होते. सध्या माशांमध्ये अंडी तयार होण्याची प्रक्रिया सुरू आहे. उष्ण तापमानामुळे माशांची अंडी नष्ट होण्याची शक्यता आहे. किंबहुना नदीपात्रातील मासे उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.