शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

डॉ.प्रभाकर भावठाणकर यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:35 IST

मंडणगड : मंडणगड तालुक्याच्या वैद्यकीय क्षेत्रात डॉ.प्रभाकर भावठाणकर यांचे योगदान हे उल्लेखनीय आणि स्मरणीय आहे. तालुक्यातील वैद्यकीय वाटचालीत त्यानी ...

मंडणगड : मंडणगड तालुक्याच्या वैद्यकीय क्षेत्रात डॉ.प्रभाकर भावठाणकर यांचे योगदान हे उल्लेखनीय आणि स्मरणीय आहे. तालुक्यातील वैद्यकीय वाटचालीत त्यानी अनेक समाजोपयोगी उपक्रम, शिबिरे राबवून सर्वसामान्य नागरिकांना दिलेली अविरत सेवा ही त्यांच्या कर्तृत्वाची पोहोचपावती असल्याच्या भावना व्यक्त करत, त्यांचा सत्कार करण्यात आला.

मंडणगड तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रभाकर भावठाणकर यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त तालुका आरोग्य कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या वतीने भिंगळोली येथील श्रीकृष्ण सभागृहात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिरुध्द आठल्ये यांच्या अध्यक्षतेखाली सेवापूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य संतोष गोवळे, माजी सभापती भाई पोस्टुरे, राजकुमार निगुडकर, रमेश दळवी, प्रकाश शिगवण, डॉ.गरुड, पोलीस निरीक्षक उत्तम पीठे, दीपक घोसाळकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.देविदास चरके, डॉ.सगरे, डॉ.भगवान पितळे, डॉ.शेखर दाभाडकर, रघुनाथ पोस्टुरे, इरफान बुरोंडकर, भावठाणकर यांची पत्नी यांच्यासह वैद्यकीय, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

आपल्या ३४ वर्षांच्या सेवेपैकी तब्बल २४ वर्षे मंडणगडसारख्या दुर्लक्षित तालुक्यात सेवा करणाऱ्या डॉ.प्रभाकर भावठाणकर व पत्नीचा मंडणगड तालुका डॉक्टर असोसिएशन व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वतीने शाल श्रीफळ, सन्मानिका व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नरेश इदाते तर सूत्रसंचालन दिलीप मराठे यांनी केले.