शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
2
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
3
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
4
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
5
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
6
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
7
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
8
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
9
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
10
Latest Marathi News LIVE :पश्चिम बंगालच्या निकालाबद्दल अरविंद केजरीवालांना शंका, 'या' मुद्द्यावर ठेवले बोट
11
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
12
'राजा शिवाजी' सिनेमाचा सीक्वल येणार? रितेश देशमुखने अखेर सांगितलं, म्हणाला- "अजून खूप..."
13
आता शौचालयात जाण्यासाठी फ्लायओव्हर बांधा! भोपाळ मनपाचा कारनामा चर्चेत, लोक संतप्त
14
नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांचा 'ओली' पॅटर्न; भारतासोबत पंगा घेणारे 'हे' २ मोठे निर्णय!
15
'राजा शिवाजी'साठी बॉलिवूड कलाकारांनी किती मानधन घेतलं? रितेश देशमुखचा गौप्यस्फोट, म्हणाला- "अभिषेक बच्चन..."
16
सावधान! अटलांटिक महासागरात मृत्यूचे तांडव; क्रूझवर 'हंताव्हायरस'चा शिरकाव, ३ पर्यटकांचा बळी!
17
स्मार्ट होम की मृत्यूचा सापळा? आग लागताच स्मार्ट लॉक खराब; दरवाजा न उघडल्याने ९ जणांचा बळी
18
एमजीआर, एनटीआर ते विजय... दक्षिणेतील मतदार अभिनेत्यांमध्ये नेता का शोधतात? ही आहेत ५ कारणं
19
बनावट जन्म दाखला घोटाळा: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून SITद्वारे सखोल चौकशीचे आदेश
20
British Airways: विमान उडवायचं नाही, फक्त जमिनीवर चालवायचंय; 'ही' एअरलाइन कंपनी पायलट्सना देतेय ९५ लाखांची सॅलरी
Daily Top 2Weekly Top 5

गावांचा विकास आराखडा तयार करावा : जिल्हाधिकारी

By admin | Updated: May 21, 2015 00:07 IST

योजनांची राबवत असताना आखून देण्यात आलेल्या वेळापत्रकाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी, त्यादृष्टीने विकास आराखडा तयार करावा,

रत्नागिरी : केंद्र शासनाच्या संसद आदर्श ग्राम योजनेच्या माध्यमातून सहभागी गावांचा कायापालट करण्याची संधी प्राप्त झाली आहे. विविध शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून आदर्श गाव साकार होऊ शकेल. गावाचा सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवून सर्व विभागप्रमुखांनी या गावांचा ग्राम विकास आराखडा तयार करावा, अशी सूचना जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिली.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित संसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत ग्रामविकास आराखडा तयार करण्यासाठी आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बोलताना राधाकृष्णन म्हणाले, संसद आदर्श ग्राम योजना ही केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे. योजनेच्या माध्यमातून गावांच्या भौतिक प्रगतीबरोबरच आर्थिक उन्नती साधायची आहे. त्यादृष्टीने योजनेत नमूद केलेल्या विकासाच्या मुद्द्यांनुसार अंमलबजावणी कार्यक्रमाची आखणी करावी आणि गावांमध्ये विकासाच्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी सर्व विभागांनी विशेष प्रयत्न करावेत. योजनांची राबवत असताना आखून देण्यात आलेल्या वेळापत्रकाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी, त्यादृष्टीने विकास आराखडा तयार करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिले.यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी विद्या मोरबाळे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. विवेक पनवेलकर, महिला बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जे. एस. शेख, समाजल्याण विभागाचे सहायक आयुक्त अर्जुन बन्ने, यशदा, पुणेच्या प्रशिक्षिका सुरेखा जोशी यांच्यासह विविध शासकीय विभागांचे प्रमुख उपस्थित होते.यावेळी योजनेचा आराखडा तयार करण्याबाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली. (प्रतिनिधी)