शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
2
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
3
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
4
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
5
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
6
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
7
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
8
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
9
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
10
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
11
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
12
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
13
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
14
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
15
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
16
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
17
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
18
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
19
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
20
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
Daily Top 2Weekly Top 5

कोळकेवाडी कार्यालय बंदबाबत मंत्रालयात चर्चा

By admin | Updated: June 29, 2016 23:55 IST

ग्रामस्थांची मागणी : बाजू समजून घ्या

शिरगाव : कोयना प्रकल्पाअंतर्गत अलोरे येथील कोळकेवाडी धरण व्यवस्थापन विभागीय कार्यालय बंद करण्याचा निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांच्या बदलीचे आदेश अंतिम टप्प्यात असताना सर्वपक्षीय मोर्चानंतर येथील शिष्टमंडळाने मंत्रालयस्तरावर जलसंपदामंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री विजय शिवतारेंशी २८ रोजी चर्चा केली. महाराष्ट्रातील ४८ विभागातील मनुष्यबळाचा वापर विकासात्मक धोरण ठरवून करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेतला असल्याचे महाजन यांनी यावेळी स्पष्ट केले. तथापि कोयना प्रकल्प उभा राहिल्यापासून संपादित जागा, धरण व्यवस्थापन, शासकीय वसाहत, अंतर्गत रस्ते, पंचक्रोशीतील सर्वांसाठी असलेल्या सुविधा केंद्रस्थानी ठेवून मंत्री महोदयांना वस्तुस्थितीची कल्पना देण्यात आली. जलसंपदा खात्याच्या अखत्यारित असलेल्या सर्व बाबींची देखभाल दुरुस्ती, आजही प्रकल्पग्रस्तांचे अनुषांगिक प्रश्न मांडण्यासाठी अलोरे कोळकेवाडी, नागावे, पेढांबे ग्रामस्थांनी कोयनानगरला जायचे का? जास्त वीजनिर्मिती पोफळी कोळकेवाडीत आणि कार्यालय कोयनेला हे अन्यायकारक असल्याचे यावेळी दाखवून दिले. राज्यव्यापी धोरणात्मक निर्णय असला तरी आमची बाजू समजून घ्यावी, अशी मागणी करताच गिरीश बापट यांनी शिष्टमंडळाच्या मुद्द्यांवर चौकशीचे आदेश दिले आहेत. (वार्ताहर) सकारात्मक कार्यवाहीस्थानिकांच्या प्रश्नांचा विचार न करता हा शासन निर्णय झाला तरी आमचे प्रश्न शासनाकडे गंभीरपणे मांडले आहेत. आश्वासनांची पूर्तता म्हणजेच कोयनेतील एक उपविभाग इथे यायला मंत्रीमहोदयांनी मान्यता दिली आहे. त्यादृष्टीने लवकरच सकारात्मक कार्यवाही होईल, असे उपतालुकाप्रमुख विनोद झगडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.