Video: मिऱ्या समुद्रात नांगर तुटल्याने जहाज भरकटले; काही खलाशी अडकल्याची भीती 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2020 10:18 AM2020-06-03T10:18:43+5:302020-06-03T10:19:10+5:30

जहाजाचा नांगर तुटल्याने जहाज भरकटल्याची माहिती समोर आली आहे.

Cyclone Nisarga: Ship stranded due to broken plow in Mirya sea; Fear of getting stuck with some sailors mac | Video: मिऱ्या समुद्रात नांगर तुटल्याने जहाज भरकटले; काही खलाशी अडकल्याची भीती 

Video: मिऱ्या समुद्रात नांगर तुटल्याने जहाज भरकटले; काही खलाशी अडकल्याची भीती 

googlenewsNext

रत्नागिरी किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळाचे आगमन झाले असून सध्या मोठ्या प्रमाणावर  जोरदार पावसासह प्रचंड वेगाने वारे वाहत आहेत. याच दरम्यान मिऱ्या समुद्रात नर्मदा सिमेटचे जहाज भरकटले आहे.

जहाजाचा नांगर तुटल्याने जहाज भरकटल्याची माहिती समोर आली आहे. जहाजाला समुद्र किनाऱ्याजवळ आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. 

सध्या रत्नागिरी, मालगुंड, जाकादेवी, पूर्णगड, पावस, हेदवी या भागात वाऱ्यांचा वेग ९० किमीपेक्षा जास्त आहे. तर जयगड किनाऱ्यावर हा वेग ११० इतका आहे. संगमेश्वर कोयनापर्यंत वाऱ्याचा वेग सध्या ९०किमीपेक्षा जास्त आहे. रत्नागिरी  जिल्ह्यातील दापोली आणि मंडणगड किनारपट्टीवरील वाऱ्याचा वेग ताशी १२० राहील असा अंदाज आहे. 

Web Title: Cyclone Nisarga: Ship stranded due to broken plow in Mirya sea; Fear of getting stuck with some sailors mac

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.