शहरं
Join us  
Trending Stories
1
जालन्यात मनसे आक्रमक! ॲड. गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर ओतली शाई, सुपाऱ्या फेकल्या
2
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
3
Thalapathy Vijay: 'थलपती विजय'साठी मैदान मोकळं? 'व्हीसीके'कडून 'टीव्हीके'ला बिनशर्त पाठिंब्याची घोषणा!
4
आपच्या पंजाबमधील मंत्र्याला ईडीकडून अटक, घरावर टाकलेल्या धाडीनंतर केली कारवाई   
5
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
6
आधी कथित गर्लफ्रेंडची हमाली, मग रात्री उशिरा डिनर पार्टी; अर्शदीप-समरीन जोडीचा नवा VIDEO व्हायरल
7
नाशिकच्या TCS प्रकरणावरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा डाव, काँग्रेसचा आरोप  
8
‘युझवेंद्र चहलला तुरुंगात पाठवले पाहिजे…’, भारताचा माजी क्रिकेटपटू संतापला, कारण  काय?  
9
शपथविधीनंतर सुवेंदू अधिकारी अभिवादन करण्यासाठी येताच योगींनी केलं असं काही, दिली खास भेट  
10
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
11
क्रिकेटपटू युवराज सिंगसोबत व्हायरल झालेल्या Video मधील अभिनेत्री नव्या नायर कोण आहे? पाहा PHOTOS
12
स्टार क्रिकेटर युवराज सिंगसोबत स्टेजवर असताना अभिनेत्रीने केली 'ती' कृती; Video होतोय व्हायरल
13
Ritual: महत्त्वाच्या कामाला जाताना 'दही-साखर' का खातात? केवळ श्रद्धा की विज्ञानाची जोड?
14
PM मोदी सर्वांसमोर माखनलाल सरकार यांच्या पाया पडले; या क्षणाबाबत त्यांची पत्नी म्हणते...
15
Mother's Day 2026 Wishes: जागतिक मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा मातृत्त्वाचा सोहळा
16
IPL 2026: भर मैदानात राडा? मग क्रुणाल पांड्याची इन्स्टाग्राम पोस्ट; त्यावर पूरननं केली 'अशी' कमेंट!
17
कार वापरताय? मग तुमच्या गरजेनुसार निवडा ‘हे’ विशेष ॲड-ऑन्स, वेळीच करा पैशांची बचत!
18
MCX Share Price: मार्च तिमाहीत एमसीएक्सचा नफा २९१% नं वाढला, ११ मे रोजी रॉकेट बनू शकतो शेअर
19
तामिळनाडूत सत्तेचं गणित जुळेना, विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाला विलंब, चाहत्यानं स्वत: पेटवून घेतलं!
20
नवीन फोन घेतलाय? मग 'या' ५ सेटिंग्ज लगेच करा; एका चुकीमुळे होऊ शकतं मोठं नुकसान!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : कोरोनाच्या संकटकाळात वाहतोय माणुसकीचा झरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 16:01 IST

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर माणसा माणसांमधील हेवेदावे संपुष्टात येत आहेत. या संकटाचा एकजूटीने मुकाबला करण्यासाठी शासन, प्रशासन सज्ज झालेले असतानाच प्रत्येकजण या संकटातून बाहेर पडण्यासाठी आता प्रयत्न करीत आहेत. कोरोनामुळे देशातील सर्वसामान्य नागरिक, मजूर, गोरगरीब लोक अधिक संकटात सापडले आहेत. हातावर पोट असलेल्या या नागरिकांची उपासमार होऊ नये म्हणून माणूसकीचा झरा आता वाहू लागला असून अनेकजणया लोकांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. सामाजिक संघटना, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून भुकेल्या लोकांना मदतीचा हात आर्थिक किवा अन्नधान्याच्या स्वरुपात दिला जात आहे.

ठळक मुद्देकोरोनाच्या संकटकाळात वाहतोय माणुसकीचा झराअनेकांकडून स्वयंस्फुर्तीने जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा

रत्नागिरी : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर माणसा माणसांमधील हेवेदावे संपुष्टात येत आहेत. या संकटाचा एकजूटीने मुकाबला करण्यासाठी शासन, प्रशासन सज्ज झालेले असतानाच प्रत्येकजण या संकटातून बाहेर पडण्यासाठी आता प्रयत्न करीत आहेत. कोरोनामुळे देशातील सर्वसामान्य नागरिक, मजूर, गोरगरीब लोक अधिक संकटात सापडले आहेत. हातावर पोट असलेल्या या नागरिकांची उपासमार होऊ नये म्हणून माणूसकीचा झरा आता वाहू लागला असून अनेकजणया लोकांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. सामाजिक संघटना, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून भुकेल्या लोकांना मदतीचा हात आर्थिक किवा अन्नधान्याच्या स्वरुपात दिला जात आहे.

रत्नागिरी शहरात अनेकसामाजिक ग्रुप, शिवसेना, भाजप, कॉँग्रेस, राष्टÑवादी कॉँग्रेस आणि काहीजण स्वतंत्रपणे अशा गरजू लोकांपर्यंत पोहोचून त्यांना मदतीचा हात देत आहेत. शहरातील भारतीय जनता पाटीर्चे प्रभाग क्रमांक १०चे नगरसेवक समीर तिवरेकर यांनी कोरोनामुळे जनतेवर आलेल्या संकटातून धीर देण्यासाठी ढवळेवाडी, कळंबटेवाडी, खालचीआळी येथे १२० कुटुंबियांना अन्नधान्य वाटप केले. यावेळी नगरसेवक समीर तिवरेकर, नगरसेविका सुप्रिया रसाळ, भाजपा युवामोर्चा माजी अध्यक्ष मंदार मयेकर, शहर सरचिटणीस बाबू सुर्वे, संदीप रसाळ, प्रसाद फडके, रामजी भानुशाली, शिवाजी आंग्रे उपस्थित होते.

रत्नागिरीचे नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांनीही शहरातील तसेच तालुक्यातील अनेक गरजू लोकांना अन्नधान्याच्या रुपाने मदतीचा हात पुढे केला आाहे. अनेक गरीब कुटुंबे, मजूरांना त्यांनी अन्नधान्याच्या रुपात मदत केली आहे. रत्नागिरीचे उपनगराध्यक्ष रोशन फाळके यांनी प्रभाग क्रमांक १ मध्ये परटवणे येथे बोरकरवाडीमध्ये ३० कुटुंबे व सरोदेवाडीतील ४८ कुटुंबांना धान्य, डाळी व जीवनावश्यक वस्तूंंचे वाटप केले आहे. शहरातील सर्वच प्रभागांमध्ये फाळके यांच्यातर्फे मोफत पाणी पुरवठाही केला जात आहे.

रत्नागिरी भाजपाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांनी स्वामी स्वरुपानंद पतसंस्थेतर्फे कोरोना संकटग्रस्तांना मदत देऊन दिलासा दिला आहे. हातावर पोट असलेल्या कुटुंबांची ओढाताण लक्षात घेऊन पतसंस्थेने तत्काळ भेट म्हणून स्वरुप भेट या नावाने ह्यकिराणा पॅकेजह्ण वितरीत केले जात आहे. शहरातील सर्वच प्रभागांमध्ये हे वितरण केले जात आहे. सहकार चळवळीला अपेक्षित असे हे काम पतसंस्थेकडून सुरू असल्याचे अ‍ॅड. पटवर्धन यांनी म्हटले आहे.

गोरगरिबांची उपासमार होऊ नये म्हणून राज्य सरकारने सुरू केलेल्या शिवभोजन थाळीचाही लाभ अनेकांना मिळत आहे. रत्नागिरी शहरातील गणेश धुरी चालवित असलेल्या शिवभोजन केंद्रातून आता शिवभोजन थाळी गरजू लोकांच्या घरी पोहोच केली जात आहे. तसेच अनेक सामाजिक संघटना, व्यक्तीकडूनही गरजुंंना अन्न-धान्याचा पुरवठा केला जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी