कोरोना अपडेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:20 IST2021-07-22T04:20:42+5:302021-07-22T04:20:42+5:30

२. मंडणगड तालुक्यातील दाभट गावातील जमातुल मुस्लीमिन यांना तजम्मुल मोहम्मद वलेले कुटुंबाकडून दोन ऑक्सिजन सिलिंडर देणगी रूपात देण्यात आले ...

Corona update | कोरोना अपडेट

कोरोना अपडेट

२. मंडणगड तालुक्यातील दाभट गावातील जमातुल मुस्लीमिन यांना तजम्मुल मोहम्मद वलेले कुटुंबाकडून दोन ऑक्सिजन सिलिंडर देणगी रूपात देण्यात आले आहेत. हे सिलिंडर मिळविण्यासाठी जमातुल मुस्लीमिन दाभटचे सचिव मन्सूर जुवळे यांच्या प्रयत्नाला यश मिळाले. यावेळी जमातुल मुस्लीमिनचे उपाध्यक्ष अब्दुल हमीद उपाध्ये, उपसचिव कय्युम जुवळे, अब्दुल्ला उपाध्ये, तजम्मुल वलेले, पेशइमाम अश्रफ धतुरे आदी उपस्थित होते.

३. संगमेश्वर तालुक्यातील राजवाडी ग्रामपंचायत येथे कोविड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरटीपीसीआर चाचणी कॅम्प लावण्यात आले होते. कडवई प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर निनाद धने आणि त्यांचे सहकारी यांच्या सहकार्याने हा चाचणी कॅम्प घेण्यात आला. यावेळी राजवाडीच्या सरपंच अस्मिता देवरुखकर, उपसरपंच दिलीप गुरव, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, शिपाई संजय मांजरेकर व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Corona update