शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
2
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
3
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
4
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
5
GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...
6
सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!
7
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
8
अमेरिकेची सात विमाने शस्त्रास्त्रांसह इस्लामाबादमध्ये दाखल; इराणच्या राष्ट्रपतींनी केली 'ही' मोठी मागणी!
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? 
10
नेपाळमध्ये राहणं झालं महाग! बालेन सरकारचा 'तो' एक नियम आणि ५० लाख मधेशींची झोप उडाली!
11
"देवेंद्र फडणवीस पूर्वी असे नव्हते, पण आता ते फक्त...", आरक्षणाच्या मुद्द्यावरून अंजली दमानिया यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
12
TCS कांड: "'प्लेयर', 'झिरो फिगर', तुझ्या शारीरिक गरजा...!" शाहरुख, रजा, आसिफच्या कृत्यानं पीडिता हादरली; एकदा तर...
13
Video: धावत्या ट्रॅव्हलमध्ये शिरला, चालकाला सपासप कानाखाली मारल्या; नवी मुंबईत आरटीओ अधिकाऱ्याची दबंगगिरी 
14
Deepa Bhati : 'ती' जिंकली! ३ मुलांची आई लग्नाच्या १८ वर्षांनंतर झाली अधिकारी; टोमणे मारणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर
15
छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video...
16
पॅन कार्डचा खेळ अन् डिलिव्हरी बॉयचं आयुष्य झालं नरक; ९.५ कोटींच्या कंपनीचा मालक पाहून पोलीसही चक्रावले!
17
जपानच्या किनाऱ्यावर बोटींची पळापळ...! खोल समुद्रात जाण्यासाठी एकामागोमाग एक, मोठी रांग,  १० फूट उंच त्सुनामीचा इशारा
18
तीन वर्षाच्या लेकीचा होता वाढदिवस, आई वडिलांसह चिमुकलीचा घरात मिळाला मृतदेह; पोलिसांनी सांगितलं काय घडलं? 
19
Video - हौसेला मोल नाही! ७४ वर्षांच्या 'आजी'चा स्वॅग; न घाबरता केलं पॅराग्लाइडिंग, म्हणाल्या...
20
Jammu Accident : २१ निष्पापांचा बळी घेणाऱ्या 'त्या' बसवर होते ८ चालान; उधमपूर अपघाताची इनसाईड स्टोरी!
Daily Top 2Weekly Top 5

विजय महायुतीचाच, पण कोणाचा ते गुलदस्त्यात-- प्रसाद लाड यांची गुगली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 00:17 IST

राज्यात महायुती आहे म्हणता, तर कणकवली मतदारसंघात भाजप उमेदवार नितेश राणे यांच्यासमोर सेनेचे अधिकृत उमेदवार सतीश सावंत कसे काय रिंगणात आहेत. अन्यत्र बंडखोरी शमविली, मग कणकवलीत

ठळक मुद्देमूळ प्रश्नाला बगल देत दिले उत्तर

रत्नागिरी : राज्यभर महायुती आहे, कणकवलीतही महायुतीचाच उमेदवार विजयी होईल, असे भाजप प्रदेश उपाध्यक्ष तथा विधानपरिषद आमदार प्रसाद लाड यांनी रत्नागिरीत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. राज्यात महायुती आहे म्हणता, तर कणकवली मतदारसंघात भाजप उमेदवार नितेश राणे यांच्यासमोर सेनेचे अधिकृत उमेदवार सतीश सावंत कसे काय रिंगणात आहेत. अन्यत्र बंडखोरी शमविली, मग कणकवलीत सेनेच्या उमेदवाराने माघार का घेतली नाही, या प्रश्नाला बगल देत नेमका कोण निवडून येणार हे सांगणे टाळले.भाजप जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या तालुकाध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या या प्रदेशकडून आधी मंजूर करून घेतल्या आहेत. त्या नियुक्त्या योग्यच आहेत, असे स्पष्ट करीत भाजप प्रदेश उपाध्यक्ष तथा विधानपरिषद आमदार प्रसाद लाड यांनी जिल्हाध्यक्ष पटवर्धन यांची पाठराखण केली आहे. पदनियुक्तीवरून जिल्हाध्यक्ष पटवर्धन व माजी जिल्हाध्यक्ष बाळ माने यांच्यात जोरदार वादंग झाले होते. याबाबत विचारता लाड बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत भाजप जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन, माजी नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, सचिन वहाळकर, तालुकाध्यक्ष सुशांत चवंडे व पक्षाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी लाड म्हणाले, राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील महायुती सरकारने गेल्या पाच वर्षात विकासाची जी कामे केली आहेत, त्यामुळे हे सरकार पुन्हा सत्तेवर येणार हा विश्वास आहे. सरकारवर आरोप करणे हे विरोधकांचे कामच आहे. विरोधकांमध्ये आता जान उरलेली नाही. ते हतबल झाले आहेत. राष्ट्रावादीतील नेत्यांनी साथ सोडल्यानेच राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना या वयातही प्रचारासाठी जावे लागतेय. कॉँग्रेसही हतबल झाली आहे. त्यामुळे २१ ऑक्टोबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला २३५पेक्षा अधिक जागा मिळतील व पुन्हा सत्ता येईल, असा दावा लाड यांनी केला.नाणार प्रकल्पाचा पुनर्विचारनाणार पुन्हा आणणार असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजापूर व रत्नागिरी दौऱ्याच्या वेळी केले होते. शिवसेनेचा या प्रकल्पाला विरोध असताना नाणार कसा काय आणला जाणार, असा सवाल करण्यात आला. त्यावर लाड म्हणाले, नाणार प्रकल्प व्हावा, अशी स्थानिकांचीच मागणी आहे. त्यामुळेच या प्रकल्पाचा पुनर्विचार होणार आहे. स्थानिकांना विकास हवा आहे. निवडणुकीनंतर उच्चस्तरीय समितीमार्फत नाणारबाबतची भूमिका पुन्हा ऐकून घेतली जाणार आहे. 

टॅग्स :Prasad Ladप्रसाद लाडRatnagiriरत्नागिरीBJPभाजपा