शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

मालगुंडमध्ये नववर्षानिमित्त राबवणार स्वच्छता उपक्रम

By admin | Updated: December 30, 2014 23:24 IST

श्री चंडिका कला पथक : राजे ग्रुपचा आगळावेगळा संकल्प

गणपतीपुळे : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक काळातील शिवकालीन जयगड किल्ल्यावर दि. १ जानेवारी २०१५ या नववर्षाच्या निमित्ताने मालगुंड येथील श्री चंडिका जाखडी कला पथक व राजे ग्रुप यांचे संयुक्त विद्यमाने स्वच्छता उपक्रम राबविण्यात येणार आहे.नवीन वर्षाचे अनेक संकल्प केले जातात. मात्र मालगुंड येथील श्री चंडिका जाखडी कला पथकाने आणि राजे ग्रुपने आगळा वेगळा संकल्प सोडला आहे. या ग्रुपने जयगड किल्ल्याची स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे.या किल्ल्यावर यंदा प्रथमच ‘स्वच्छता मोहीम’ हा उपक्रम श्री चंडिका जाखडी - कलापथक व राजे ग्रुपतर्फे हाती घेण्यात आला आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने संपूर्ण जयगड किल्ला परिसरातील साफसफाई होण्यास मदत होणार आहे. शिवाय अनेक ठिकाणचे शिवकालीन किल्ले स्वच्छता उपक्रम राबवून किल्ल्याचे संवर्धन व डागडुजी करणेदेखील गरजेचे ठरणार आहे, अशी भावना या उपक्रमामधून इतर शिवप्रेमींसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.२०१५ या नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जयगड किल्ल्यावर स्वच्छता उपक्रम राबविण्याची संकल्पना मालगुंड येथील राजे ग्रुप व जाखडी पथकाने आखल्याने या उपक्रमात जयगड दशक्रोशीतील इतर शिवप्रेमींनीसुद्धा सहभागी व्हावे, असे आवाहन मालगुंड जोशीवाडी जाखडी कलापथकाचे प्रमुख संस्थापक बावा आग्रे यांनी केले आहे.या दिवशी जाखडी कला पथक व राजे ग्रुपचे सर्व सदस्य उपक्रमात सहभागी होणार असून, एकदिवसीय कालावधीत संपूर्ण किल्ल्याचा परिसर साफसफाईने स्वच्छ करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यापुढे आपण कायमपाणे जयगड किल्ल्यावर प्रतिवर्षी अशा प्रकारचा उपक्रम सुरु ठेवणार असल्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे. (वार्ताहर)