शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
5
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
6
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
7
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
8
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
9
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
10
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
11
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
12
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
13
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
14
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
15
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
16
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
17
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
18
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
19
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
20
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
Daily Top 2Weekly Top 5

चिरेखाणी सताड उघड्याच

By admin | Updated: August 20, 2015 22:03 IST

आदेश धाब्यावर : मालकांना ना चिंता, प्रशासनाला ना काळजी

राजेंद्र यादव -रत्नागिरीउत्खननाचे काम बंद झाल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश चिरेखाणी उघड्या असतात. संरक्षण कठडा न बांधताच संरक्षित उपाययोजनेच्या दृष्टीने त्या धोकादायक ठरत आहेत. यामुळे लोकांच्या जीवितास धोका पोहोचण्याची आणि अपघात घडण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात सध्या चिरेखाण व्यवसाय करणे प्रतिष्ठेचे मानले जात आहे. त्यामुळे बरेचजण चिरेखाण व्यवसायात गुंतले आहेत. जिल्ह्याचे महसूल खाते फक्त रॉयल्टी घेत आहे. त्यामुळे शासनाचा महसूल वाढत असला तरी तहसीलदारांनी आपल्या मंडल अधिकाऱ्यांना, तलाठ्यांना अथवा तत्सम गावकऱ्यांना आदेश देऊन चिरे खाणीच्या सभोवती संरक्षक कठडा घालून घेणे आवश्यक आहे. खाण मालकांचेही ते कर्तव्य आहे. परंतु जिल्ह्यात तसे कुठेही आढळून येत नाही. पावसाळ्यात या खाणी पाण्याने तुडुंब भरलेल्या असतात. सुटीच्या दिवसात शेतकऱ्यांची मुले जनावरे चारण्यासाठी अथवा कुतूहलापोटी पोहण्यासाठी या खाणीतही खोल पाण्यामध्ये उड्या मारतात. खाणीमधील खोलीचा व पाण्याचा त्या लहान मुलांना अंदाज नसतो. खाणीच्या तळाशी चिकट मातीचा थर जमा झालेला असतो. त्यामुळे या पोहणाऱ्या मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू ओढवतो. अशा अनेक घटना यापूर्वी जिल्हाभरामध्ये घडलेल्या आहेत. वन्य प्राणी, पाळीव जनावरे यांचाही तोल जाऊन त्याच्या जीवावर बेतू शकते.हे लक्षात घेऊन तत्कालीन जिल्हाधिकारी राजीव जाधव यांनी या चिरेखाणींना कुंपण घालण्याचे आदेश काढले होते. ते आदेश चक्क धाब्यावर बसवण्यात आले आहेत.तहसीलदारांनी या उघड्या चिरेखाणी बंदिस्त करण्यासाठी संबंधितांना आदेश देणे गरजेचे आहे. ज्या उघड्या चिरेखाणी आहेत, त्यांना संरक्षित कठडे बांधून घेणे, हे तेथील तलाठी किंवा ग्रामपंचायतीचे कर्तव्य आहे. परंतु आतापर्यंत तसे झालेले नाही. प्रशासन नागरिकांच्या जिवाशी खेळत असून, अपघाताला आमंत्रण देत आहेत.