शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

चिपळूण बाजारपूल मागी

By admin | Updated: February 6, 2015 00:40 IST

नगर परिषद : पूल जोडणार विकासाचा सेर्तू

उत्तमकुमार जाधव - चिपळूण शहरातील वाशिष्ठी नदीवर बांधण्यात येणाऱ्या, बाजारपुलाच्या कामाला गती देण्यात आली असून, हे काम १८ महिन्यांत पूर्ण करण्याची मुदत संबंधित ठेकेदाराला देण्यात आली आहे. मुंबई, पुण्याच्या धर्तीवर हा पूल उभा होणार असल्याने, शहराच्या विकासात या पुलामुळे विशेष भर पडणार आहे. शहरातील नाईक कंपनीसमोरील वाशिष्ठी नदीवर १९६०-६१च्या दरम्यान पूल बांधण्यात आला होता. गोवळकोट, पेठमाप आदी भागातील नागरिकांच्या दृष्टीने हा पूल महत्त्वाचा आहे. २००५मध्ये आलेल्या महापुरामुळे या पुलाला धोका निर्माण झाला. तत्कालीन नगराध्यक्ष उषा लवेकर यांच्या कारकीर्दीत तत्कालीन नगर विकास मंत्री सुनील तटकरे यांच्याकडे पुलाच्या कामाबाबत २००६मध्ये पत्रव्यवहार करण्यात आला. तत्कालीन नगराध्यक्ष हेमलता बुरटे यांनी २००८ मध्ये बाजारपूल होण्याच्या दृष्टीने माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडे पुलाच्या बांधकामासाठी निधी मिळावा, यासाठी माजी आमदार रमेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रव्यवहार सुरु केला. तत्कालीन नगराध्यक्ष अजमल पटेल यांच्या कारकीर्दीत २ सप्टेंबर २०१०मध्ये या पुलाचे बांधकाम करण्यासाठी जीवन प्राधिकरण विभाग यांच्याकडे ठराव प्रारित करण्यात आला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अंदाजपत्रक तयार झाल्यानंतर ७ जानेवारी २०१० मध्ये पुलाच्या बांधकामास मंजुरी देण्यात आली. मात्र, हे काम २ वर्ष रखडल्याने या भागातील रहिवाशांनीही पुलाचे काम त्वरित सुरु करण्याबाबत नगर परिषदेवर धडक मोर्चाही दिला होता. त्यानुसार, १९ जुलै २०१२ रोजी नगराध्यक्ष सावित्री होमकळस यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य सभेत अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली. आर्किटेक्ट आगरकर यांच्याकडून या पुलाच्या बांधकामाचे सुधारित अंदाजपत्रक तयार करून घेण्यात आले. त्यानुसार, ७ जुलै २०१३ रोजी पुलाचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले. त्यानुसार, ९ जून २०१४ रोजी या पुलाच्या कामाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली. ६ कोटी ९८ लाख २५ हजार ३७५ची निविदा प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार, १३ जून २०१४ रोजी या पुलाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. सध्या नदीमध्ये ३० फूट अंतरावर ६ पाईल्स टाकण्यात आले आहेत. पुढील काही दिवसात आणखी ६ पाईल्स टाकल्या जाणार आहेत. एकूण २४ पाईल्स टाकल्यानंतर उर्वरित काम हाती घेतले जाणार आहे. एस. डी. इन्फ्रास्ट्रक्चर, मुंबई या कंपनीस हे काम देण्यात आले आहे. सप्टेंबर २०१५ अखेर या पुलाचे काम करण्याची मुदत ठेकेदारास देण्यात आली असून, मुदतीत हे काम पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. ९० मीटर लांबीचा व ८.२५ मीटर रुंदीचा हा पूल उभा होणार असल्याने, शहराच्या वैभवात या पुलामुळे भर पडणार आहे. तांत्रिक अडचणी दूर करुन मुदतीत पूल रहिवाशांसाठी खुला करण्याच्यासाठी कामाला गती देण्यात आली आहे.अठरा महिन्यांत काम पूर्ण करणारवाशिष्ठी नदीत ३० फूटाचे ६ पाईल्स (खांब) टाकण्याचे अधिकांश काम पूर्ण.२४ पाईल्स टाकण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर, उर्वरित काम सुरु होणार. येत्या आठवड्यात आणखी ६ पाईल्स. ६ कोटी ९८ लाख २५ हजार ३७५ रुपयांचे अंदाजपत्रक. कामाची मुदत १८ महिन्यांची.