शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

चिपळुणात शिवसेनेचेच पारडे जड

By admin | Updated: September 20, 2014 00:27 IST

या मतदार संघाने आजवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील अंतर्गत वादच जास्त पाहिले आहेत. बंडखोरीचे सर्वाधिक प्रकार याच तालुक्यात झाले आहेत.

आधी काँग्रेसकडे असलेला चिपळूण विधानसभा मतदार संघ १९९0पासून शिवसेनेच्याच ताब्यात आहे. २00४मधील एक निवडणूक वगळता शिवसेनेने या मतदार संघावरील आपली पकड कायम ठेवली आहे. भास्कर जाधव यांचा शिवसेना सोडून राष्ट्रवादीतील प्रवेश हा या मतदार संघातील आजवरचा सर्वात मोठा धक्का होता. भास्कर जाधव आणि रमेश कदम यांनी चिपळूण विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीची ताकद कायम ठेवली असली तरी शिवसेनेची पकड अधिक आहे. १९९0मध्ये बापूसाहेब खेडेकर चिपळूण मतदार संघात आमदार झाले. तेव्हापासून या मतदार संघात परिवर्तन झाले. अर्थात त्यावेळी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली म्हणून ही जागा शिवसेनेला मिळाली होती. तत्कालीन आमदार निशिकांत तथा नाना जोशी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार होते आणि बाळासाहेब माटे यांनी बंडखोरी करून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. या दोघांची एकत्रित मते विजयी झालेल्या बापूसाहेब खेडेकर यांच्यापेक्षा अधिक होती. तेव्हापासून या मतदार संघातील चित्र पालटले.१९९५ आणि ९९मध्ये भास्कर जाधव शिवसेनेकडून आमदार झाले. २00४ मध्ये त्यांनी शिवसेना सोडली आणि अपक्ष निवडणूक लढवली. त्यात राष्ट्रवादीचे रमेश कदम विजयी झाले. तसं पाहिलं तर चिपळूण पंचायत समितीत आणि चिपळूण नगर परिषदेत राष्ट्रवादीचा आपला वाटा राखून आहे. याआधी गोविंदराव निकम हयात असतानाही चिपळूण हेच काँग्रेसच्या राजकारणाचे मुख्य केंद्र होते. आता त्यांचे चिरंजीव आणि राष्ट्रवादीचे विद्यमान जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांच्यामुळे राष्ट्रवादीच्या राजकारणाचा केंद्रबिंदू चिपळूण हाच आहे. पण विधानसभा मतदार संघ म्हणून विचार केला तर चिपळूण आणि संगमेश्वर या तालुक्यांमध्ये तळागाळात सर्वाधिक ताकद शिवसेनेची आहे.या मतदार संघाने आजवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील अंतर्गत वादच जास्त पाहिले आहेत. बंडखोरीचे सर्वाधिक प्रकार याच तालुक्यात झाले आहेत. पक्षांतर्गत वादातून आपल्या पक्षाचा उमेदवार पाडण्याचे प्रकारही याच तालुक्यात अधिक झाले आहेत. भास्कर जाधव यांच्या जाण्यानंतरही शिवसेना सावरली असून, शिवसेनेची मतदार संघावरील पकड पुन्हा कायम झाली आहे.