गाईच्या मृत्युप्रकरणी चालकाविराेधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:50 IST2021-05-05T04:50:53+5:302021-05-05T04:50:53+5:30

रत्नागिरी : बेदरकारपणे गाडी चालवून गाईला धडक देत, तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालकाविरोधात शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात ...

A case has been registered against the driver in connection with the death of a cow | गाईच्या मृत्युप्रकरणी चालकाविराेधात गुन्हा दाखल

गाईच्या मृत्युप्रकरणी चालकाविराेधात गुन्हा दाखल

रत्नागिरी : बेदरकारपणे गाडी चालवून गाईला धडक देत, तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालकाविरोधात शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवार, २ मे रोजी रात्री ११.१५ वाजण्याचा सुमारास कोकणनगर येथील नाईक चिकन सेंटर समोर घडली.

या प्रकरणी हरीश भास्कर चौगुले (रा.कोहिनूर पॅलेस गाडीतळ, रत्नागिरी) याच्याविराेधात गुन्हा दाखल केला आहे.

त्याच्याविरोधात संजय दत्तात्रय लिंगायत (५२, रा.आलिशान कॉर्नर कोकणनगर, रत्नागिरी) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार, रविवारी रात्री हरीश आपल्या ताब्यातील इको गाडी (एमएच ०२, बीआर ९१८५) घेऊन मिरजोळे ते मारुती मंदिर असा भरधाव वेगाने जात होता. तो नाईक चिकन सेंटर समोर आला असता, तेथील मोरीच्या पुढे एका गाईला त्याने धडक देत अपघात केला. यात गाईचा मृत्यू झाला. या प्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस फौजदार भगवान पाटील करत आहेत.

Web Title: A case has been registered against the driver in connection with the death of a cow