शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

चौपदरीकरणाला बाजारपेठांमध्ये ब्रेक

By admin | Updated: July 13, 2015 00:36 IST

मुंबई-गोवा महामार्ग : अतिरिक्त जमिन मोजणी पूर्ण

रत्नागिरी : गेल्या दहा वर्षांच्या काळात मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातात सहा हजारांपेक्षा अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. हा महामार्ग म्हणजे ‘डेड ट्रॅक’ या नावाने ओळखला जाऊ लागला. या मार्गावरील मरणकळा संपाव्यात, यासाठी लोकांच्या मागणीनुसार इंदापूर ते झाराप या ३८४ किलोमीटर लांबीच्या महामार्गाचे चौपदरीकरण ५ हजार कोटी खर्च करून केले जाणार आहे. मात्र, पाली, लांजा बाजारपेठ व राजापूर शहरातील काही भागामुळे चौपदरीकरणाच्या कामाला सध्यातरी ब्रेक लागला आहे. मुंबई - गोवा महामार्गावरील पनवेल ते इंदापूर या ० ते ८४ किलोमीटर रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम याआधीच सुरू आहे. तर झाराप ते पात्रादेवी या २१.५ किलोमीटर मार्गाचे चौपदरीकरण पूर्ण झाले आहे. आता इंदापूर ते झारापपर्यंतच्या ३८४ किलोमीटर्स महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घोषणा केल्यानंतर या प्रकल्पाला केंद्राने मंजुरी दिली. या कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असेही गडकरी यांनी स्पष्ट केले आहे. चौपदरीकरणासाठी मुंबई - गोवा महामार्गाचा २१३ किलोमीटरचा रस्ता रत्नागिरी जिल्ह्यात असून, १०७.९ किलोमीटर रस्ता सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. दोन्ही जिल्ह्यातील महामार्गावर १९ मोठे पूल व ७१ लहान पूल आहेत. या चौपदरीकरणामुळे महामार्गावरील अपघातप्रवण क्षेत्रही आपोआपच कमी होणार आहेत. मात्र, पाली बाजारपेठ व लांजा बाजारपेठेत चौपदरीकरण करताना दोन्ही बाजूने दुकाने मागे घ्यावी लागणार आहेत. तसेच राजापुरातही काही धार्मिक जागा अडचणीच्या ठरल्या आहेत. त्यामुळे महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला ब्रेक लागला असून, या समस्या तातडीने सोडविण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)महामार्गावरील मरणकळा थांबणार?चौपदरीकरणासाठी मुंबई -गोवा महामार्गाचा २१३ किलोमीटरचा रस्ता रत्नागिरी जिल्ह्यात असून, १०७.९ किलोमीटर रस्ता सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. या दोन्ही जिल्ह्यात महामार्गावर १९ मोठे पूल व ७१ लहान पूल आहेत. चौपदरीकरणामुळे महामार्गावरील अपघातप्रवण क्षेत्रही आपोआप कमी होणार आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.