शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

बोडस चॅरिटेबल ट्रस्टची आशादीप संस्थेला मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:22 IST

रत्नागिरी : सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या बोडस चॅरिटेबल ट्रस्टमार्फत आशादीप मतिमंद मुलांचे पुनर्वसन केंद्र याला विविध ...

रत्नागिरी : सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या बोडस चॅरिटेबल ट्रस्टमार्फत आशादीप मतिमंद मुलांचे पुनर्वसन केंद्र याला विविध प्रकारची मदत करण्यात आली आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर पूर्वनियोजित पद्धतीने आणि सर्व सुरक्षा निकष पाळून ही मदत करण्यात आली.

ट्रस्टचे अध्यक्ष सीएमए उदय बोडस यांच्या मातोश्री सुमित्रा बोडस यांना मे महिन्यात ८५ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यावेळी कडक निर्बंध असल्याने कोणताही धार्मिक विधी न करता त्याचा खर्च मदत म्हणून आशादीपला देण्यात आला. त्याचा धनादेश ट्रस्टचे अध्यक्ष सीएमए उदय बोडस यांनी आशादीपचे अध्यक्ष दिलीप रेडकर याना सुपूर्द केला. तसेच वाढदिवसाचा खाऊ म्हणून १०० चॉकलेट देण्यात आली.

यावेळी ट्रस्टचे विश्वस्त यशराज बोडस यानी आशादीप केंद्रातील सदस्यांना खाऊसाठी २४ बिस्कीट पुडे आणि शर्ट- टी शर्ट- बर्म्युडा पॅण्ट, साडी व कॉटनचे पंचे असा १० कपड्यांचा सेट परावलंबी प्रौढ दिव्यांगांसाठी दिला. लॉकडाऊनचा परिणाम म्हणून आलेल्या मंदीमुळे मदतीचा ओघ कमी झाला असताना बोडस चॅरिटेबल ट्रस्टची ही विविध प्रकारची मदत आम्हाला हुरूप देणारी आहे ,असे उद्गार दिलीप रेडकर यांनी यावेळी काढले. याप्रसंगी आशादीपच्या व्यवस्थापिका स्मिता जडे उपस्थित होत्या.

फोटो ओळी-

आशादीप संस्थेला बोडस चॅरिटेबल ट्रस्टमार्फत खाऊ आणि कपडे देण्यात आले. यावेळी मदतीचा धनादेश दिलीप रेडकर यांच्याकडे बोडस चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सीएमए उदय बोडस यांनी सुपूर्त केला.