शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत गोळी झाडून फकिराचा खून

By admin | Updated: June 30, 2016 00:06 IST

हल्लेखोर बुरखाधारी : तरुणालाही धमकावले

रत्नागिरी : दोन्ही हातात कुबड्या घेऊन जेवणासाठी चालत जाणाऱ्या सैतुल्ला नामक फकिरावर अज्ञात बुरखाधारी हल्लेखोराने गावठी कट्ट्याने गोळी झाडली. पाठीवर वर्मी बसलेल्या या गोळीने फकीर जोरदार किंकाळी मारत रस्त्यावर कोसळला. दहा मिनिटे त्याची तडफड सुरू होती. त्यानंतर त्याची प्राणज्योत मालवली. शहरातील पऱ्याची आळी येथे भर रस्त्यावर बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. गोळी झाडल्यानंतर पळून जाणाऱ्या हल्लेखोरास पकडण्यासाठी तेथीलच एक तरुण धावला. मात्र, त्याच्यावरही हल्लेखोराने गावठी कट्टा रोखला व तो काळोखात पसार झाला. गोळीबाराच्या आवाजाने गजबजलेल्या या भागातील निवासी इमारतींमधील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. घटनेनंतर काही काळातच रत्नागिरी शहर पोलिस, गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस व राखीव दलाचे पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. हल्लेखोराने गोळी झाडल्यानंतर प्रमोद महाजन संकुलाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याने पलायन केले. त्याने वाहन दुसऱ्या ठिकाणी उभे करून ठेवलेले असावे व त्यावरून तो पसार झाला असावा, असाही अंदाज व्यक्त होत आहे. शहराच्या सर्व भागात हल्लेखोराला पकडण्यासाठी पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे. रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून पंचनाम्याचे काम सुरू होते. घटनास्थळी जिल्हा पोलिस अधीक्षक प्रणय अशोक, पोलिस निरीक्षक शिवाजी पाटील, शहर पोलिस अधिकारी तसेच रत्नागिरीचे नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, माजी नगराध्यक्ष अशोक मयेकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)वैमनस्यातून कृत्य?फकिराचा अज्ञाताने केलेला खून हा वैमनस्यातून झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. गोळीबाराआधी संबंधित फकीर कुबड्या घेऊन जेवणासाठी निघाला होता, तर त्याच्यासोबत आणखी एक अपंग फकीरही जेवणासाठी निघाला होता. त्यावेळी हा गोळीबार केवळ एकाच फकिरावर झाला. त्यामुळे हा खून नियोजनबद्ध असल्याचा संशय आहे. मृत फकिराजवळ नोटांचे बंडलही सापडल्याची चर्चा आहे.खैरातीसाठी रत्नागिरीत...रमजान महिना सुरू असल्याने राज्यातून तसेच राज्याबाहेरूनही खैरातीसाठी अनेक फकीर जिल्ह्याच्या विविध भागात दाखल झाले आहेत. ज्याच्यावर गोळीबार झाला तो सैतुल्लानामक फकीरही खेड, चिपळूण या भागातून गेल्या चार दिवसांपासून रत्नागिरीतील पवित्र धर्मस्थळाच्या बाहेर खैरातीसाठी आला होता, असे त्याच्यासोबत घटनेवेळी उपस्थित असलेल्या कोलकाता येथील एका फकिराने सांगितले.