लायन्स क्लब गॅलेक्सीतर्फे रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:20 IST2021-07-03T04:20:43+5:302021-07-03T04:20:43+5:30

चिपळूण : येथील लायन्स क्लब गॅलेक्सीतर्फे अशोक मेहता यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून घेतलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या ...

Blood donation camp by Lions Club Galaxy | लायन्स क्लब गॅलेक्सीतर्फे रक्तदान शिबिर

लायन्स क्लब गॅलेक्सीतर्फे रक्तदान शिबिर

चिपळूण : येथील लायन्स क्लब गॅलेक्सीतर्फे अशोक मेहता यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून घेतलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या रक्तदान शिबिराचे आयाेजन चिपळूण लायन्स क्लबच्या अध्यक्ष स्वाती देवळेकर यांनी केले होते. यावेळी नूतन सचिव अक्षदा रेळेकर, खजिनदार विभावरी जाधव, नूतन झोन चेअरमन संजय कोकाटे, नूतन अध्यक्ष तुषार गोखले यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रांजल गुजाटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी रिजनल चेअरमन नितीन गांधी, झोन सचिव अरविंद भंडारी, लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष अरुण कदम, माजी अध्यक्ष अजय भालेकर, नहूष चितळे, जगदीश वाघदुळे, सिद्धेश लाड, रमेश रेळेकर, साजन कापडी, भय्या कदम, लायन्स क्लब चिपळूण गॅलेक्सीचे सर्व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रश्मी सावर्डेकर यांनी केले.

Web Title: Blood donation camp by Lions Club Galaxy