शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

खानू येथील विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 9:47 AM

बिबट्याची डरकाही त्यांना विहिरीच्या दिशेने ऐकू आली. आवाजाचा मागोवा घेत ते आणि शेजारील ग्रामस्थ विहिरीच्या दिशेने गेले. त्यांनी तत्काळ पाली येथील परिमंडल वन कार्यालय पाली येथे संपर्क साधला.

ठळक मुद्दे- बिबट्याला सुरक्षित अधिवासात सोडणार

पाली : रत्नागिरी तालुक्यातील खानु गावामधी कोंडवाडी येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढून जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. हा बिबट्या तंदुरुस्त असून तो अडीच वर्षाच्या आसपास आहे. शिकारीचा पाठलाग करताना तो विहिरीत पडल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले आहे. या बिबट्याला चांदोली अभयारण्यात सोडण्यात येणार आहे.खानु कोंडवाडी येथील माजी पोलीस पाटील अनंत गोपाळ सुवारे यांच्या परसबागेतील २५ फूट खोल विहिरीत बिबट्या पडल्याचे सकाळी ७ वाजता कळले. बिबट्याची डरकाही त्यांना विहिरीच्या दिशेने ऐकू आली. आवाजाचा मागोवा घेत ते आणि शेजारील ग्रामस्थ विहिरीच्या दिशेने गेले. त्यांनी तत्काळ पाली येथील परिमंडल वन कार्यालय पाली येथे संपर्क साधला. त्याचबरोबर खानु पोलीस पाटील अनंत कांबळे यांच्याशीही संपर्क साधून ही माहिती देण्यात आली.परिमंडल वन अधिकारी गौतम कांबळे, वन अधिकारी सुरेश उपरे, वनपाल ना.सी. गावडे, व्ही.डी.कुंभार, सागर पाताडे, मिताली कुबल हे घटनास्थळी पिंजरा घेऊन दाखल झाले. कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने पिंजरा विहिरीत सोडला. तब्बल दोन ते अडीच तासांच्या अथक प्रयत्नाने बिबट्या पिंजऱ्यात गेल्यावर त्याला विहिरीतून बाहेर काढण्यात आले.यावेळी स्थानिक ग्रामस्थ प्रकाश कांबळे, दिनेश चाळके, दशरथ सावंत, संतोष गराटे, श्रीपत पेंढारी, महेंद्र पेंढारी, धनंजय चव्हाण यांच्यासह विभागीय वन अधिकारी र.सी.भवर, परिक्षेत्र वन अधिकारी प्रियांका लगड यांनी उपस्थित राहून मदत केली. बिबट्याला अभयारण्यात सोडण्यात येणार आहे.

टॅग्स :forest departmentवनविभागRatnagiriरत्नागिरी