शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
2
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
3
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
4
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
5
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
6
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
7
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
8
मुख्यमंत्री वैद्यकीय निधी ठरतोय रुग्णांचा ‘आधार’, उपनगरात ८६९ रुग्णांना ८.१० कोटींची मदत
9
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
10
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
11
Mumbai RTO News: आरटीओच्या सेवा ऑनलाइन; तरीही कार्यालयांमध्ये हेलपाटे
12
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
13
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
14
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
15
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
16
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
17
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
18
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
19
Ration Card News: आता लाभार्थ्यांना एकाचवेळी मिळणार तीन महिन्यांचे रेशन
20
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

अर्जुना परिसराला भरतीचा तडाखा

By admin | Updated: January 25, 2015 00:53 IST

शेतकरी भयग्रस्त : शेतात पाणी घुसल्याने नुकसान

राजापूर : मागील ६० ते ७० वर्षांत कधी आली नाही, एवढी भरती दोन दिवसांपूर्वी आल्याने खाडीकाठावरील अनेक लगतच्या गावातील शेतजमिनीत खारे पाणी घुसून, मोठ्या प्रमाणात तयार पिकांचे नुकसान झाले. शेकडो हेक्टर जमीन पुढील काही वर्षांसाठी नापीक बनण्याचा धोका व्यक्त केला जात आहे. तालुक्यातील अर्जुना नदीकाठानजीक तसेच खाडी किनाऱ्यालगत असणारे विल्ये, गोवळ, शिवणे पडवे, अणसुरे पाखाडी या गावातील शेतकऱ्यांना या मोठ्या भरतीचा फटका बसला आहे. दरवर्षी या गावातील अनेक शेतकरी वरणा, उडीद, कुळीथ, मिरची, वांगी, वाल यासहित विविध प्रकारच्या पालेभाज्यांचे उत्पन्न घेऊन त्यावर आपली उपजीविका करीत असतात. स्थानिक बाजारपेठेत या मालाची विक्री होत असते. मात्र या समस्त शेतकऱ्यांना गत मंगळवारी आलेल्या भरतीने दणका दिला आहे. या गावातील बुजुर्ग मंडळींनी दिलेल्या माहितीनुसार मागील ६० ते ७० वर्षात एवढी मोठी भरती कधीच आली नव्हती. या भरतीचे पाणी आजूबाजूच्या भातशेतीच्या जमिनीत घुसले असून, त्यामुळे अनेक ठिकाणची तयार पीकांवर त्याचा विपरीत परिणाम झाला आहेच. शिवाय परिसरातील मोठ्या प्रमाणातील भातजमिनी नापीक बनण्याचा धोका वर्तविला जात आहे. त्यामुळे, स्थानिक शेतकऱ्यांपुढील प्रश्न अधिक जटील बनला आहे. येऊन गेलेल्या भरतीमध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी सागवे जिल्हापरिषद सदस्य अजित नारकर, अणसुरे पंचायत समिती सदस्या रेखा कोंडकर, कृषी अधिकारी भाऊसाहेब मराठे, आपटे गावचे पोलीस पाटील आदींनी केली आहे. अचानक आलेल्या मोठ्या भरतीने स्थानिक शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण कायम आहे. राजापूर तालुक्यातील अर्जुना नदीकाठी असलेल्या शेतजमिनीचे नुकसान दोन दिवसांपूर्वी आलेल्या प्रचंड भरतीमुळे झाले आहे. या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याबाबत शासकीय यंत्रणेने त्वरित लक्ष घालावे, अशी मागणी त्या परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. (प्रतिनिधी) सत्तर वर्षांत प्रथमच भरतीचे पाणी गावात घुसले. विल्ये, अणसुरे, पडवे येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान. भातशेतीबरोबरच हिवाळी भाजीपालाही वाया. संभाव्य धोका टाळण्यासाठी महसूलकडे धाव. पंचनामे कधी करणार. महसूल पथक गावात येणार.