शिक्षकांना उन्हाळी सुट्टी जाहीर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:31 IST2021-04-24T04:31:46+5:302021-04-24T04:31:46+5:30

वाटूळ : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी वर्षभर ...

Announce summer vacation to teachers | शिक्षकांना उन्हाळी सुट्टी जाहीर करा

शिक्षकांना उन्हाळी सुट्टी जाहीर करा

वाटूळ : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी वर्षभर शासनाने दिलेल्या सूचनांप्रमाणे राज्यातील शिक्षकांनी ऑनलाइन शिक्षणाचे काम तसेच कोविडयोध्दा म्हणून काम केले आहे. शासनाच्या सर्व आदेशांचे पालन करून शिक्षकांनी कर्तव्य निभावले आहे. शिक्षकांना १ मे ते १५ जून या कालावधीत उन्हाळी सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी शिक्षण क्रांती संघटना राज्याध्यक्ष सुधीर घागस यांनी केली आहे.

महाराष्ट्र खासगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ नुसार शालेय कर्मचाऱ्यांना त्रिस्तरीय वेतनश्रेणी लागू आहे. वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी प्रशिक्षणाची अट आहे. पाच वर्षांपासून हे प्रशिक्षण झालेले नाही. त्यामुळे अनेक शिक्षक पुढील श्रेणीपासून वंचित आहेत. यावर्षी सुट्टी जाहीर करून वरिष्ठ व निवडश्रेणीसाठी सर्व पात्र शिक्षकांचे ऑनलाइन सेवाअंतर्गत प्रशिक्षण घेतल्यास पात्र शिक्षकांना वेतनश्रेणींचा लाभ मिळू शकेल. याकरिता, उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत सेवाअंतर्गत प्रशिक्षणे घेण्यात यावीत अशी मागणी शिक्षणमंत्री यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. हे निवेदन शिक्षण क्रांती संघटनेचे राज्याध्यक्ष सुधीर घागस, कोकण विभाग अध्यक्ष रमेश जाधव यांनी दिले आहे.

Web Title: Announce summer vacation to teachers