शहरं
Join us  
Trending Stories
1
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
2
महिलांना दरमहा ३००० रुपये, मोफत बस प्रवास अन्...! सुवेंदू सरकार ॲक्शन मोडवर, १ जूनपासून खात्यात जमा होणार पैसे
3
"रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही, प्रेमाने सांगून ऐकलं नाही तर..."; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा इशारा 
4
IPL 2026 सुरू असताना धोनी अचानक NSG कॅम्पमध्ये; कमांडोंसोबत केला नेमबाजीचा सराव (VIDEO)
5
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
6
Top Marathi News LIVE: पालघरमध्ये वऱ्हाडाच्या ट्रकला कंटेनरची भीषण धडक, १२ जणांचा मृत्यू, ३५ जखमी
7
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
8
Twisha Sharma : "हनिमूनलाच समर्थने माझ्या मुलीला..."; ट्विशाच्या वडिलांनी ढसाढसा रडत सांगितले जावयाचे कारनामे
9
ओट्स की पोहे... वेट लॉस आणि एनर्जीसाठी एकदम परफेक्ट आहे 'हा' नाश्ता; फायदे एकदा वाचाच
10
“ST ही ग्रामीण भागासाठी अत्यावश्यक सेवा, तत्काळ भाडेवाढ करणार नाही, पण...”: प्रताप सरनाईक
11
"मराठी वारशाची शान घेऊन...", कान्स रेड कार्पेट गाजवल्यानंतर अशोक सराफ यांची पोस्ट
12
भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनची झलक आली समोर; जपानच्या तंत्रज्ञानाने सज्ज; काय आहेत वैशिष्ट्ये?
13
बहिणीकडे राहून शिक्षण ते १०० कोटींचे साम्राज्य...; मोटेगावकर सरांना 'त्या' १०१ प्रश्नांच्या व्हिडिओनेच अडकवले
14
Adhik Maas 2026: 33 अंकाचे रहस्य; अधिक मासात का मानतात ३३ आकडा खास, काय आहे कनेक्शन?
15
Adhik Maas 2026: विनायक चतुर्थीला अंगारक योग, ‘असे’ करा गणपती व्रत पूजन; दुपटीने शुभ-लाभ!
16
IND vs AFG Test: जसप्रीत बुमराह OUT; रणजी गाजवणाऱ्या Auqib Nabi Dar साठी उघडणार टीम इंडियाचा दरवाजा?
17
एकच सामना, एक SMS अन् IPL चा प्रवास संपला... बांगलादेशी क्रिकेटपटूने सांगितली दुःखद कहाणी
18
Twisha Sharma : Video - "माझी मुलगी शूर होती, सासरचे..."; ट्विशाच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
19
दगडफेक केली, AC तोडले... लोकांच्या संतापाचा उद्रेक; गरिबांचे पैसे हडपल्याचा सरपंचावर आरोप
20
स्मार्टफोनमुळे कमी होतोय जन्मदर, रिलेशनशिप होत आहे अवघड; माणसाच्या आयुष्यावर मोठा परिणाम, नव्या संशोधनात काय?
Daily Top 2Weekly Top 5

मानधनवाढीसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची निदर्शने

By admin | Updated: July 11, 2017 00:02 IST

सीटू प्रणित अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या मानधनवाढीसाठी शासनाने गठीत केलेल्या समितीच्या शिफारशी तत्काळ लागू कराव्यात, यासह इतर मागण्यांसाठी सीटू प्रणित महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्यावतीने जिल्हा परिषद कार्यालयासमोर १० जुलै रोजी निदर्शने करण्यात आली.
सोमवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास जिल्हाभरातून सीटू प्रणित महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या सभासद जिल्हा परिषद कार्यालयासमोर जमा झाल्या. संघटनेचे जिल्हाध्यक्ष पंजाबराव गायकवाड यांच्या नेतृत्वात जमलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी आपल्या मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी करून निदर्शने केली. महिलांच्या आंदोलनाची तीव्रता पाहून जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती श्वेता महाले, अंगणवाडी सेविका तथा जि.प.सदस्य संगीता शिनगारे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी सुनील मेसरे हे आंदोलनस्थळी आले. यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, २० जून २०१६ रोजी शासन व कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश करून मानधनवाढ समिती स्थापन करण्यात आली होती. अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या मानधनवाढीसंदर्भात या समितीने केलेल्या शिफारशी लवकरच लागू करू, असे आश्वासन महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी दोनदा दिले होते; मात्र हे आश्वासन पाळल्या गेले नाही, त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. त्यासाठीच या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय निवेदनात मानधनवाढ समितीच्या शिफारशी तत्काळ लागू कराव्यात, सेविका व मदतनीसांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, पेन्शन, पदोन्नती, आरोग्य विमा, भविष्यनिर्वाह निधी लागू करावा, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. या आंदोलनात मंदा डोंगरदिवे, जयश्री क्षीरसागर, सविता चोपडे, बेबी दाठे, संगीता मादनकर, सुनंदा मोरे, उषा जैवळ, प्रतिभा वक्टे, माया तायडे, सुवर्णा लाटे, अश्विनी सपकाळ, सुनीता पांडव, प्रतिभा आराख यांच्यासह जिल्हाभरातून आलेल्या शेकडो अंगणवाडी व सेविका, मदतनीस सहभागी झाल्या होत्या. दरम्यान, येत्या पावसाळी अधिवेशनात मानधनवाढ समितीच्या शिफारसी मंजूर न झाल्यास जुलै महिन्याचा मासिक अहवाल देण्यावर बहिष्कार तसेच ११ सप्टेंबरपासून संपूर्ण राज्यभर अंगणवाडी सेविका मदतनीस बेमुदत संप पुकारतील, असा इशारा या आंदोलनातून देण्यात आला आहे.