आजकाल हेल्दी ब्रेकफास्टबाबत लोकांमध्ये बरीच चर्चा पाहायला मिळते. कोणी सकाळची सुरुवात ओट्सने करणं उत्तम मानतं, तर कोणासाठी गरमागरम पोहे हा सर्वात चांगला नाश्ता असतो. हे दोन्ही पदार्थ झटपट तयार होतात, खिशाला परवडणारे आहेत आणि पोटासाठीही हलके मानले जातात. पण जेव्हा विषय वजन कमी करण्याचा आणि दिवसभर शरीरात एनर्जी टिकवून ठेवण्याचा येतो, तेव्हा मात्र ही निवड तितकी सोपी राहत नाही.
न्यूट्रिशन एक्सपर्ट्सने दिलेल्या माहितीनुसार, सर्वात चांगला नाश्ता तोच आहे ज्यामुळे दीर्घकाळ पोट भरलेलं राहितं, पचनक्रियेला मदत होते आणि शरीराला सुस्ती न आणता पुरेशी ऊर्जा मिळते. भारतात ओट्स आणि पोहे हे दोन्ही पदार्थ हेल्दी ब्रेकफास्ट म्हणून वेगाने लोकप्रिय झाले आहेत, पण शरीरावर त्यांचा होणारा परिणाम वेगवेगळ्या पद्धतीचा असतो.
ओट्स खाण्याचे फायदे
ओट्सचा थेट संबंध फिटनेस आणि वेट लॉसशी जोडला जातो. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे यामध्ये असलेले 'बीटा-ग्लुकन' नावाचं विरघळणारे फायबर होय. हे फायबर पचनक्रिया संथ करतं, ज्यामुळे दीर्घकाळ भूक लागत नाही. 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ'च्या संशोधनानुसार, बीटा-ग्लुकन पोट भरल्याची जाणीव वाढवण्यास आणि भूक नियंत्रित ठेवण्यास मदत करू शकतं. यामुळेच ओट्स खाल्ल्यानंतर वारंवार काहीतरी खाण्याची इच्छा कमी होते.
ओट्स खरंच हेल्दी असतात का?
ओट्स हळूहळू पचतात, ज्यामुळे शरीराला सतत ऊर्जा मिळत राहते आणि ब्लड शुगर अचानक वाढत नाही. मात्र तज्ज्ञ असाही इशारा देतात की, बाजारात मिळणारे फ्लेवर्ड इन्स्टंट ओट्स, ज्यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते, ते आरोग्यासाठी चांगले नाहीत. यासाठी साधा रोल्ड ओट्स किंवा स्टील-कट ओट्स हाच सर्वात उत्तम पर्याय मानला जातो.
पोहे खाण्याचे फायदे
पोह्याला बऱ्याचदा ओट्सच्या तुलनेत कमी लेखलं जातं, कारण ते ओट्सपेक्षा हलके वाटतात. पण हीच त्याची सर्वात मोठी खासियत आहे. पोह्यांपासून बनणारा हा पदार्थ पचायला अत्यंत हलका असतो आणि झटपट तयार होतो. जेव्हा पोह्यांमध्ये शेंगदाणे, मोहरी आणि कढीपत्ता टाकला जातो, तेव्हा त्याचे पोषणमूल्य खूप वाढतं. शेंगदाण्यांमुळे प्रोटीन आणि हेल्दी फॅट्स मिळतात, तर लिंबामुळे शरीराला लोह शोषून घेण्यास मदत होते.
तुमच्यासाठी अधिक चांगलं काय?
'नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन'मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार, वजन घटवण्यासाठी केवळ एकाच आहारावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी संपूर्ण डाएट पॅटर्न समजून घेणं अधिक महत्त्वाचं आहे. एक्सपर्ट्सच्या मते, खरा प्रश्न 'ओट्स विरुद्ध पोहा' असा नसून, तुमचा नाश्ता किती बॅलेन्स आहे हा आहे. ज्या नाश्त्यामध्ये पुरेसे फायबर, प्रोटीन आणि आरोग्यदायी घटक असतात, तोच शरीराला दीर्घकाळ ऊर्जा देतो. त्यामुळे पोहे आणि ओट्स हे दोन्ही शरीरासाठी फायदेशीर आहेत.
Web Summary : Oats and poha are popular, healthy breakfasts. Oats, rich in fiber, aid weight loss by promoting fullness. Poha is light and easily digestible, offering nutrients when combined with peanuts and lemon. A balanced breakfast with fiber and protein is key for sustained energy.
Web Summary : ओट्स और पोहा लोकप्रिय और स्वस्थ नाश्ते हैं। फाइबर से भरपूर ओट्स पेट भरने का एहसास कराकर वजन घटाने में मदद करते हैं। पोहा हल्का और आसानी से पचने वाला होता है, जो मूंगफली और नींबू के साथ पोषक तत्व प्रदान करता है। फाइबर और प्रोटीन से भरपूर संतुलित नाश्ता ऊर्जा के लिए ज़रूरी है।