शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

चाकरमान्यांच्या तपासणीसाठी ८०२ आरोग्य पथके कार्यरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:35 IST

रत्नागिरी : गणेशाेत्सवाच्या पार्श्वभूमीवर काेराेना रुग्णांची संख्या वाढण्याचा धाेका अधिक आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनासह पाेलीस व आराेग्य विभागही सतर्क ...

रत्नागिरी : गणेशाेत्सवाच्या पार्श्वभूमीवर काेराेना रुग्णांची संख्या वाढण्याचा धाेका अधिक आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनासह पाेलीस व आराेग्य विभागही सतर्क झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ठिकठिकाणी आराेग्य पथके तैनात करण्यात आली आहेत. जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागामध्ये तपासणीसाठी ८०२ आरोग्य पथके तैनात करण्यात आली आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी दिली.

गणेशोत्सवासाठी आजपर्यंत एसटी, रेल्वेसह खासगी गाड्यांनी लाखभर चाकरमानी जिल्ह्यात दाखल झाले होते. गणरायाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळाने मुंबईतील विविध स्थानकांमधून गाड्यांची व्यवस्था केली होती. शुक्रवारपर्यंत जिल्ह्यात १२०० गाड्या दाखल झाल्या. त्यामधून सुमारे पन्नास हजारांहून अधिक चाकरमानी आले आहेत. कोकण रेल्वेच्या माध्यमातूनही हजारो प्रवासी आले आहेत. या सर्वांची आराेग्य तपासणी करण्यात आली आहे.

हे नियोजन जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. कोविड-१९ च्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करून आपल्या गणेशभक्तांना व जनतेला सुरक्षित ठेवण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावर, बस स्थानके व रेल्वे स्टेशन येथे तसेच गाव पातळीवर ग्राम कृती दल कार्यरत ठेवण्यात आलेले आहेत. गणेशोत्सवाकरिता आलेल्या चाकरमान्यांची तपासणी आरोग्य पथकांमार्फत करण्यात येत आहे.

जिल्ह्यामध्ये महामार्ग, बस स्थानक, रेल्वे स्टेशन येथे २५ आरोग्य पथके आणि प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावरून ग्रामपातळीवर एकूण ७७७ पथके कार्यरत आहेत. गणेशोत्सवाकरिता आलेल्या चाकरमान्यांची आरटीपीसीआर व ॲंटिजन अशा एकूण ५,००० पेक्षा जास्त चाचण्या घेण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी दिली.

----------------------------

दैनंदिन कीटकजन्य, जलजन्य आजाराच्या व साथरोगाच्या अनुषंगाने जिल्हा रुग्णालय, सर्व उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये व सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे येथे साथरोग प्रतिबंधक किट अद्ययावत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोविड-१९ आजाराव्यतिरिक्त इतर कोणत्याही साथ रोगाची लागण झालेली नाही. तरी कोविड-१९ आजारसदृश लक्षणे असलेल्या व्यक्तींनी तपासणी करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

----------------------

तालुका महामार्ग, बसस्थानके, प्राथमिक आरोग्य केंद्र

रेल्वे स्थानकावर कार्यरत स्तरावरून ग्रामपातळीवरील

आरोग्य पथके कार्यरत आरोग्य पथके

मंडणगड १ २०

दापोली १ ४७

खेड ४ ११४

गुहागर १ ३०

चिपळूण ४ १३०

संगमेश्वर ६ ९१

रत्नागिरी ३ १८१

लांजा २ ६३

राजापूर ३ १०१

एकूण २५ ७७७