दापोलीकरांच्या सेवेत ३५ बेडचे कोविड सेंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:31 IST2021-04-24T04:31:44+5:302021-04-24T04:31:44+5:30

दापाेली : कोरोना रुग्णांची वाढती संख्या व त्यांना बेडही उपलब्ध होत नसल्याची स्थिती लक्षात घेता, डॉ. प्रसाद आंबेकर यांच्या ...

35 bed covid center in the service of Dapolikar | दापोलीकरांच्या सेवेत ३५ बेडचे कोविड सेंटर

दापोलीकरांच्या सेवेत ३५ बेडचे कोविड सेंटर

दापाेली : कोरोना रुग्णांची वाढती संख्या व त्यांना बेडही उपलब्ध होत नसल्याची स्थिती लक्षात घेता, डॉ. प्रसाद आंबेकर यांच्या पुढाकाराने दापोली नगरपंचायतीची केळसकर नाका येथील म्युनिसिपल डिस्पेन्सरीसाठी बांधलेली इमारत खासगी तत्त्वावर देण्यात आली आहे. याठिकाणी ३५ बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. हे सेंटर २४ एप्रिलपासून सुरू हाेणार आहे. त्यामुळे आता दापोली तालुक्यातील रुग्णांच्या सोयीसाठी शहरात तीन डेडिकेटेड काेराेना हेल्थ सेंटर्स उपलब्ध केली आहेत.

दापोली उपजिल्हा रुग्णालय व भागवत हॉस्पिटल येथे कोविड रुग्णालये सेवेत आहेत. त्यामध्ये केळकर नाक्यावरील नगरपंचायतीच्या म्युनिसिपल इमारतीतील डॉ. आंबेकर यांच्या कोविड हॉस्पिटलची भर पडली आहे. या हॉस्पिटलमुळे दापोली शहरातील बेडची गरज काहीअंशी पूर्ण होणार आहे. दापोली उपजिल्हा रुग्णालयात केवळ २८ बेडची क्षमता असणारे डीसीएससी सेंटर तसेच भागवत हॉस्पिटल येथे १५ बेडची क्षमता असणारे हॉस्पिटल बाधित रुग्णांच्या सेवेत सुरू होते. परंतु आता डॉ. आंबेकर यांच्या ३५ बेडच्या हॉस्पिटलची भर पडली आहे. तसेच दापोली उपजिल्हा रुग्णालयात असणारे २८ बेडचे डीसीएससी सेंटरची क्षमता ४८ बेड झाली आहे. तसेच लवकरच दापोली उपजिल्हा रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन जनरेशन प्लांट सुरू होणार आहे. दापोली तालुक्यासाठी एक कार्डियो रुग्णवाहिका मिळणार आहे.

Web Title: 35 bed covid center in the service of Dapolikar