जेके फाईल कंपनीतील १९ कर्मचारी पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:22 IST2021-06-03T04:22:59+5:302021-06-03T04:22:59+5:30

शिरगाव : चिपळूण तालुक्यातील गाणे खडपोली औद्योगिक वसाहतीमधील जेके फाईल्स या कंपनीतील कामगारांची तीन दिवसांपूर्वी ४७ जणांची आरटीपीसीआर तपासणी ...

19 employees of JK File Company are positive | जेके फाईल कंपनीतील १९ कर्मचारी पॉझिटिव्ह

जेके फाईल कंपनीतील १९ कर्मचारी पॉझिटिव्ह

शिरगाव : चिपळूण तालुक्यातील गाणे खडपोली औद्योगिक वसाहतीमधील जेके फाईल्स या कंपनीतील कामगारांची तीन दिवसांपूर्वी ४७ जणांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी १९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कामगारवर्ग व व्यवस्थापन हादरून गेले आहे.

मागील महिन्यात जेके फाईल कंपनीतील सात कामगारांचा, तर जेके तालाबोट कंपनीतील दोन कामगारांचा असे या समूहातील नऊ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संबंधित कंपनीतील कामगारांनी काम बंद आंदोलन केले होते. यावेळी कंपनी व्यवस्थापनेने कामगारांची जबाबदारी घेत पुन्हा कामावर बोलावून घेतले. कंपनीकडून सर्व खबरदारी घेतली जात होती. याविषयी तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांनी कंपनी व्यवस्थापनाला सूचनाही केल्या होत्या. मात्र आता याच कंपनीतील तब्बल १९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

Web Title: 19 employees of JK File Company are positive