आजचे राशीभविष्य, १ डिसेंबर २०२५: भविष्यासाठी आर्थिक नियोजन करण्यास आजचा दिवस अनुकूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 07:30 IST2025-12-01T07:29:38+5:302025-12-01T07:30:20+5:30

Horoscope Today: आजचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील? वाचा संपूर्ण राशीभविष्य.

Today's Horoscope, December 1, 2025: Today is a favorable day for financial planning for the future | आजचे राशीभविष्य, १ डिसेंबर २०२५: भविष्यासाठी आर्थिक नियोजन करण्यास आजचा दिवस अनुकूल

आजचे राशीभविष्य, १ डिसेंबर २०२५: भविष्यासाठी आर्थिक नियोजन करण्यास आजचा दिवस अनुकूल

मेष - आज चंद्र 01 डिसेंबर, 2025 सोमवार च्या दिवशी मीन राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र बारावा स्थानी आहे. आज आपला कल धार्मिकता व गूढ विद्या ह्याकडे होईल. द्विधा मनामुळे ठाम निर्णय आपण घेऊ शकणार नाही. शक्यतो आज आर्थिक देवाण - घेवाण करू नका. शारीरिक व मानसिक बेचैनी राहील. मंगल कार्यावर पैसा खर्च होईल. आणखी वाचा 

वृषभ- आपल्या राशी पासून चंद्र लाभात स्थानी आहे. आज व्यापारात वृद्धी होण्या बरोबरच व्यापार विषयक सौदे लाभदायक ठरतील. उत्पन्नाच्या साधनांत वाढ होईल. वडीलधारी व मित्र ह्यांच्याकडून लाभ व सुखद क्षण लाभतील. दांपत्य जीवनात सुख समाधान मिळेल. पर्यटनाचे बेत आखाल. महिला वर्गाकडून लाभ होतील व मान - सन्मान मिळेल. आणखी वाचा

मिथुन- आपल्या राशी पासून चंद्र दशमात स्थानी आहे. आज आपले प्रत्येक काम सुरळितपणे पार पडेल. घर, कार्यालय व सार्वजनिक ठिकाणी अनुकूल वातावरण राहिल्याने मनास प्रसन्न वाटेल. मान - सन्मान वाढतील. वरिष्ठांच्या सहकार्यामुळे आपल्या प्रगतीचा मार्ग रुंदावेल. कौटुंबिक जीवनात आनंद पसरेल. सांसारिक सुख उत्तम मिळेल. आणखी वाचा

कर्क- आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात स्थानी आहे. आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्या बरोबरच भाग्योदयाची संधी आपली प्रसन्नता वाढवेल. परदेशातून सुखद बातम्या येतील. मंगल कार्य, प्रवास ह्यामुळे आपल्या आनंदात भर पडेल. कुटुंबियांसह चांगल्या प्रकारे वेळ जाईल. आणखी वाचा

सिंह- आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी आहे. आज प्रकृतीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. त्यासाठी पैसा सुद्धा खर्च होऊ शकतो. आज घरचे पदार्थ खाणे अधिक फायदेशीर होऊ शकेल. नकारात्मक विचार मनात येतील, ते दूर करावे लागतील. आणखी वाचा

कन्या-   आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी आहे. आज नवीन कामाची सुरूवात न करणे हितावह राहील. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. बाहेरचे खाणे - पिणे टाळावे लागेल. आज आपला स्वभाव चिडचिडा झाल्याने बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. कुटुंबियांशी मतभेद संभवतात. खूप खर्च होईल. पाण्या पासून जपून राहावे लागेल. आणखी वाचा

तूळ-  आपल्या राशी पासून चंद्र सहावा स्थानी आहे. आज आपले स्वास्थ्य उत्तम राहील. व्यापारात लाभ होईल. सहकार्‍यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. कुटुंबियांसह वेळ आनंदात घालवू शकाल. बोलण्यावर ताबा ठेवा. खर्च वाढणार नाही याकडेही लक्ष द्या. आणखी वाचा

वृश्चिक-  आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी आहे. आज आपण वाद - विवादात अडकाल. संतती विषयी चिंता लागेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळाल्याने त्यांचा उत्साह अधिकच वाढेल. शेअर्स व सट्टा ह्यात गुंतवणूक न करणे हितावह राहील. शक्य असेल तर प्रवास टाळा. भविष्यासाठी आर्थिक नियोजन करण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. आणखी वाचा

धनु- आपल्या राशी पासून चंद्र चवथा स्थानी आहे. आज जास्त संवेदनशीलते मुळे कौटुंबिक गोष्टींत मानसिक तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. द्विधा मनःस्थिती मुळे मनात चलबिचल वाढेल. आरोग्याच्या दृष्टीने पण दिवस चांगाल नाही. आईच्या तब्बेती विषयी विशेष खबरदारी घ्यावी लागेल. निद्रानाशाचा त्रास होईल. आणखी वाचा

मकर-  आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी आहे. आजचा दिवस मित्र - परिवारासह आनंदात जाईल. एखाद्या पर्यटन स्थळाला भेट द्याल. स्थावर मिळकती संबंधीची कामे आज करू शकाल. व्यवसाय करणार्‍यांना आजचा दिवस अनुकूल आहे. विद्यार्थ्यांना सुद्धा अनुकूलताच लाभेल. प्रतिस्पर्धी पराभूत होतील. स्वास्थ्य टिकून राहील. आणखी वाचा

कुंभ-  आपल्या राशी पासून चंद्र दुसरा स्थानी आहे. आज द्विधा मनःस्थिती असल्याने निर्णय घ्यायला त्रास होईल. निरर्थक खर्च होतील. बोलण्यावर ताबा नसल्याने कुटुंबीयांशी मतभेद होऊ शकतात. विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या वेळी मन एकाग्र होणार नाही. आणखी वाचा

मीन- आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी आहे. आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम असेल. वातावरण उत्साहपूर्ण असल्याने नवीन कामे सुरू करण्याची प्रेरणा मिळेल. कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल. मित्र व कुटुंबीय यांच्यासह प्रवासास जाऊ शकाल. धनप्राप्ती संभवते.  आणखी वाचा 

Web Title : आज का राशिफल, 1 दिसंबर 2025: वित्तीय योजना के लिए अनुकूल दिन।

Web Summary : 1 दिसंबर, 2025, विभिन्न भाग्य लेकर आया है। मिथुन राशि वालों को करियर में सफलता, कर्क राशि वालों को भाग्य का साथ, जबकि सिंह राशि वालों को स्वास्थ्य के प्रति सावधानी बरतने की आवश्यकता है। वृश्चिक राशि वालों को वित्तीय योजना से लाभ होगा। अन्य लोगों को पारिवारिक तनाव या मिश्रित परिणाम का सामना करना पड़ेगा। अपना विस्तृत राशिफल जांचें।

Web Title : Daily Horoscope, December 1, 2025: Good day for financial planning.

Web Summary : December 1, 2025, brings varied fortunes. Gemini prospers in career, Cancer enjoys luck, while Leo needs health caution. Scorpio benefits from financial planning. Others face family stress or mixed results. Check your detailed horoscope.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.