School Collapse: मोठी दुर्घटना! राजस्थानमध्ये शाळेचे छत कोसळले, ६ विद्यार्थ्यांचा मृत्यू, मदतकार्य सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 12:58 IST2025-07-25T10:14:33+5:302025-07-25T12:58:32+5:30
Rajasthan School Collapse: शुक्रवारी सकाळी राजस्थानमधील झालावाड येथे एका उच्च प्राथमिक शाळेचे छत कोसळून सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

School Collapse: मोठी दुर्घटना! राजस्थानमध्ये शाळेचे छत कोसळले, ६ विद्यार्थ्यांचा मृत्यू, मदतकार्य सुरू
Jhalawar School Collapse:राजस्थानमधील झालावाड जिल्ह्यातील पिपलोडी गावात आज शुक्रवारी (२५ जुलै २०२५) रोजी सकाळी एका सरकारी शाळेत मोठी दुर्घटना घडली. सकाळच्या प्रार्थना सभेदरम्यान शाळेच्या इमारतीचे छत अचानक कोसळले. या घटनेनंतर कॅम्पसमध्ये गोंधळ उडाला. आतापर्यंत या अपघातात सहा मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रशासनाकडून या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
१८ वर्षाखाली सहमतीने शारीरिक संबंध ठेवू शकतो का?; केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलं उत्तर
प्रार्थनेदरम्यान छत कोसळले
विद्यार्थी शाळेच्या नियमित प्रार्थना सभेला उपस्थित असताना हा अपघात झाला. दरम्यान, अचानक शाळेचे छत कोसळले. या ढिगाऱ्याखाली अनेक विद्यार्थी अडकल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच लोकांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले.
घटनेचे गांभीर्य पाहून प्रशासनाने जेसीबी मशीन बोलावून ढिगारा काढण्यास सुरुवात केली. ढिगाऱ्याखाली अजूनही अनेक विद्यार्थी अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बचावकार्य वेगाने सुरू आहे.
जखमींना रुग्णालयात केले दाखल
ढिगाऱ्यातून बाहेर काढलेल्या जखमी विद्यार्थ्यांना तातडीने मनोहरठाणा येथील आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. काही मुलांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना झालावाड जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
VIDEO | Jhalawar, Rajasthan: Roof of Piplodi Primary School collapses, several children feared trapped. Rescue operations underway.#RajasthanNews#Jhalawar
— Press Trust of India (@PTI_News) July 25, 2025
(Full video available on PTI Videos - https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/K0STKQwP0A