शहरं
Join us  
Trending Stories
1
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
2
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
3
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
4
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
5
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
7
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
8
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
9
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
10
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
11
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
12
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
13
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
14
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
15
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
16
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
17
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
18
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
19
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
20
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

जिल्हा परिषद आरक्षणाची आज सोडत; उत्सुकता शिगेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 11:03 PM

नीलिमा पाटील, महादेव दिवेकर, दिलीप भोईर यांच्या नावाची चर्चा

अलिबाग : जिल्हा परिषद अध्यक्षपदाची आरक्षण सोडत मंगळवार, १९ नोव्हेबर रोजी मंत्रालयात पार पडणार आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षण पडणार याबाबत कमालीची उत्सुकता आहे. या वेळेला अध्यक्षपदी पेण तालुक्यातील सदस्याला संधी देण्यात येणार असल्याचे बोलले जाते. आरक्षण खुला प्रवर्ग अथवा ओबीसी पडल्यास नीलिमा पाटील, तर एसटी प्रवर्गासाठी आरक्षण पडल्यास शेकापचे महादेव दिवेकर आणि दिलीप भोईर यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.जिल्हा परिषदेमध्ये शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांची आघाडी आहे. शिवसेना आणि भाजप हे विरोधी बाकावर बसले आहेत. जिल्हा परिषदेमधील पक्षीय बलाबल शेकाप २३, शिवसेना १८, राष्ट्रवादी १२, काँग्रेस आणि भाजप प्रत्येकी तीन असे एकूण ५९ सदस्य आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसचे फक्त १२ सदस्य निवडून आले असताना त्यांना थेट अध्यक्षपद देण्यात आले होते. खासदार सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे या अध्यक्षपदी विराजमान होत्या. त्या श्रीवर्धनमधून विधानसभेवर निवडून गेल्याने तसेच त्यांचा अडीच वर्षांचा कालावधी संपत आल्याने त्यांनी काहीच दिवसांपूर्वी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. सध्या शेकापचे उपाध्यक्ष आस्वाद पाटील हे हंगामी अध्यक्ष म्हणून कामकाज पाहत आहेत. शिक्षण व आरोग्य आणि महिला बालकल्याण या विभागाचे सभापतीपद शेकापने राष्ट्रवादी कँग्रेसला दिले आहे. शेकापकडे उपाध्यक्ष, अर्थ व बांधकाम, समाजकल्याण आणि कृषी विभागाचे सभापती पद आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपला आहे. अलिखित नियमानुसार आता अध्यक्षपद हे शेकापकडे जाणार आहे.या वेळी पेण विभागाला नेतृत्वाची संधी मिळावी यासाठी शेकापच्या सदस्या नीलिमा पाटील यांचे नाव अध्यक्षपदासाठी पुढे आहे. ओबीसी महिला अथवा खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण पडल्यास पाटील त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे बोलले जाते. एसटी प्रवर्गाचे आरक्षण पडल्यास पेणमधून शेकापचे महादेव दिवेकर आणि अलिबागमधील दिलीप भोईर यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. दरम्यान, राज्यात सत्तेत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडीने रायगड जिल्हा परिषदेतील सत्तांतर होईल की तेच राहील हे आरक्षण सोडतीनंतरच समोर येणार आहे.सध्या शेकापचे उपाध्यक्ष आस्वाद पाटील हंगामी अध्यक्ष म्हणून कामकाज पाहत आहेत. शिक्षण व आरोग्य आणि महिला बालकल्याण या विभागाचे सभापतीपद शेकापने राष्ट्रवादी काँग्रेसला दिले आहे.