ट्रक-टँकरच्या धडकेत दोघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 05:37 AM2021-04-22T05:37:52+5:302021-04-22T05:38:03+5:30

टँकरचालक गंभीर जखमी; नांदगाव उड्डाणपुलावरील घटना  

Two killed in truck-tanker collision | ट्रक-टँकरच्या धडकेत दोघांचा मृत्यू

ट्रक-टँकरच्या धडकेत दोघांचा मृत्यू

googlenewsNext

पनवेल : दुभाजकाकडील पहिल्या लेनवर उभ्या करून ठेवलेल्या टँकरला पाठीमागून आलेल्या दुसऱ्या ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली.
हा अपघात पनवेलजवळील नांदगाव गावासमोरील उड्डाणपुलावर टी-पॉईंटकडून पळस्पेकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडला. टँकरवरील चालक अख्तर अलीने त्याचा टँकर रस्त्यात बंद पडल्याने दुभाजकाकडील पहिल्या लेनवर उभा असताना पाठीमागून आलेल्या ट्रकला हा टँकर न दिसल्याने धडक बसून झालेल्या अपघातात चालक राजेंद्र दादा कांबळे (वय ४०) गंभीर जखमी झाले. तसेच टँकरचालक अख्तर अलीसुद्धा गंभीररीत्या जखमी झाला. 
कांबळे आणि अली यांचा मृत्यू झाला. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात केली आहे.
 

Web Title: Two killed in truck-tanker collision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात