शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
2
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
7
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
11
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
12
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
13
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
14
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
15
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
16
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
17
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
18
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
19
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
20
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
Daily Top 2Weekly Top 5

माणगावमधून रेल्वे जाऊ देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2021 00:36 IST

खासदार सुनील तटकरे यांची कोकण रेल्वे चेअरमन यांना ताकीद

लोकमत न्यूज नेटवर्कमाणगाव : माणगाव शहरात कोकण रेल्वे दुपदरीकरणाच्या उंच भरावांमुळे पावसाळ्यात पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होत नाही. या आधी दोन वेळा कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. परंतु त्यांनी त्यावर योग्य ती कारवाई अद्यापपर्यंत केलेली नाही हे प्रत्यक्षात कचेरी रोड येथे स्वतः जाऊन खासदार सुनील तटकरे यांनी पाहणी केले असता निदर्शनास आले. त्यावर कोकण रेल्वे चेअरमन यांना संपर्क केला असता पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक ते काम करा अन्यथा माणगाव शहरातून रेल्वे जाऊ दिली जाणार नाही, अशी सक्त ताकीद खासदार सुनील तटकरे यांनी दिले.

१ मार्च रोजी माणगाव तहसील कार्यालय येथे खासदार सुनील तटकरे यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत ज्या समस्या माणगावकरांना भेडसावत आहे त्याचे निवारण करून लवकर काम पूर्ण करण्याचे आदेश खासदार सुनील तटकरे  यांनी कोकण रेल्वे, एमएसआरडीसी तसेच संबंधित अधिकाऱ्यांना दिले.  मोर्बा रोडवर गेली अनेक वर्षे गटाराचा प्रश्न प्रलंबित आहे. तेथेही प्रत्यक्षात खा. तटकरे यांनी भेट देऊन गटाराचा प्रश्न लवकर मार्गी लावावा व उपजिल्हा रुग्णालयासमोरील विद्युतीकरणाचे काम म्हणजे विद्युत खांब हलविणे लवकर करावे असे आदेश विद्युत मंडळ अधीक्षक अभियंता यांना दिले. निजामपूर रोडवरील रेल्वे ब्रिजजवळ एमएसआरडीसीने केलेल्या कामामुळे नैसर्गिक होणाऱ्या पाण्याचा निचऱ्याला अडथळा निर्माण झालेला आहे. तिथे येत्या ४ दिवसात महामार्ग अधिकाऱ्यांनी पाहणी करून स्लॅब ड्रेनेजचे तसेच आवश्यक ते काम करावे असेही आदेश देण्यात आले. यावेळी माणगाव प्रांताधिकारी प्रशाली दिघावकर, तहसीलदार प्रियांका आयरे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष सुभाष केकाणे, नगराध्यक्षा योगीता चव्हाण, उपनगराध्यक्ष दिलीप जाधव, माजी नगराध्यक्ष आनंद यादव, रत्नाकर उभारे, संदीप खरंगटे, नितीन वाढवळ आदी नगरसेवक, कोकण रेल्वे, एमएसआरडीसी, एमएसईबी अधिकारी व नागरिक उपस्थित होते.

काम गतीने पूर्ण करावेमुंबई-गोवा, दिघी-पुणे राष्ट्रीय महामार्गाचे काम करत असताना ज्या चुका झालेल्या आहेत त्या सुधाराव्या व काम जलद गतीने पूर्ण करावे. तसेच अनेक रेल्वे गाड्यांचे थांबे माणगाव येथे बंद करण्यात आले आहेत. याबाबत रेल्वे पूर्णतः मार्गावर सुरू झाल्यानंतर माणगाव येथे सर्व गाड्यांचे थांबे देण्यात यावेत व माणगाव येथे मोठे जंक्शन करण्यात यावे, यासाठी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांचीही लवकरात लवकर भेट घेणार असल्याचे खा. सुनील तटकरे यांनी यावेळी सांगितले.