शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प आता पाकिस्तानचेही ऐकेनात, इराणला दिली उघड धमकी; म्हणाले, “करार होत नाही तोपर्यंत...”
2
IPL 2026: सूर्यकुमार यादवचा 'फ्लॉप शो' सुरूच, ६ पैकी ५ सामन्यात 'फेल'; MI संघाबाहेर काढणार?
3
"माझं विमान रनवेवर मुद्दाम ३० मिनिटं थांबवलं, याचा बदला घेऊ"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
4
Latest Marathi News LIVE Updates: "ट्रम्प सर्वाधिक भ्रष्ट आणि निष्ठूर माणूस", माजी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचे टीकास्त्र
5
लग्नसराईपूर्वी सोन्या-चांदीत घसरण; जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर...
6
ट्रम्प यांच्या धमकीवर इराणचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही अजून सर्व पत्ते उघडले नाहीत”
7
Unseasonal Rain: ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट... पनवेल, नवी मुंबई, रायगडात पावसाची हजेरी, नागरिकांची तारांबळ
8
Raigad Crime: तरुणीचा रक्ताच्या थारोळ्यात विवस्त्र अवस्थेत सापडला मृतदेह; लॉजमध्ये हत्या करून आरोपी फरार
9
धडधड वाढली, युद्ध पुन्हा पेटणार? नेतन्याहू म्हणाले, "इराणमधील आमचे मिशन अजून बाकी आहे"; ट्रम्प यांचीही धमकी
10
“जिथे कोणी जात नाही तिथे मी जातो”; DCM शिंदेंचा दुर्गम भागापर्यंत विकास पोहोचवायचा निर्धार
11
IPL 2026: अवघ्या ३० रूपयांनी बदललं Ashwani Kumarचं नशीब; ४ बळी घेत Mumbai Indiansला जिंकवलं!
12
आजचे राशी भविष्य: २१ एप्रिल २०२६: हाती घेतलेली कामे पूर्ण होतील, 'या' राशींना धनलाभाचा योग
13
“महिला आरक्षणावरील चर्चेसाठी CM फडणवीसांनी PM मोदींनाही आणावे”; प्रणिती शिंदेंचे प्रतिआव्हान
14
Supreme Court: फक्त उच्च शिक्षण पुरेसे नाही, सरकारी नोकरीसाठी सर्वोच्च न्यायालयाने घातली अट!
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींची भरभराट, नवीन नोकरीची संधी; उत्पन्नात वाढ, पण बजेट सांभाळा!
16
Learning License: लर्निंग लायसन्स प्रक्रिया पुन्हा 'ऑफलाईन'; गैरप्रकार रोखण्यासाठी आरटीओचे पाऊल
17
Government Employees Strike: सरकारी कर्मचारी, शिक्षक आजपासून बेमुदत संपावर, त्यांच्या मागण्या काय आहेत? 
18
Jammu Ramnagar Bus Accident: चालकाचे नियंत्रण सुटलं, बस डोंगरावरून १०० मीटर खोल दरीत कोसळली, २१ जण ठार
19
Ashwini Paul: पार्टनरला भेटायला गेली अन् बनली ड्रग्ज सप्लायर, कोण आहे अश्विनी पॉल?
20
नेस्को ड्रग्ज प्रकरण: अनेक ड्रग्ज पेडलर्स, कॉन्सर्टमध्ये ‘विदाउट तिकीट’!
Daily Top 2Weekly Top 5

Unseasonal Rain: ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट... पनवेल, नवी मुंबई, रायगडात पावसाची हजेरी, नागरिकांची तारांबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 08:59 IST

Panvel Navi Mumbai Rain Updates: अचानक आलेल्या पावसाने चाकरमान्यांचा गोंधळ, लहान मुलांनी घेतला पावसात भिजण्याचा आनंद

Panvel Navi Mumbai Rain Updates: गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या पनवेलनवी मुंबईकरांना आज सकाळी अचानक आलेल्या पावसाने थोडासा दिलासा दिला. दमट हवामानामुळे पावसाची चिन्हे दिसत असतानाच, सकाळी ८ वाजताच्या सुमारास पनवेलसहनवी मुंबईत पावसाने हजेरी लावली. अवकाळी आलेल्या पावसासोबतच ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट यामुळे घराबाहेर नोकरीसाठी किंवा विविध कामांसाठी गेलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. रेल्वे स्थानक, मुख्य रस्ते, बाजारपेठा आणि चौकांत अचानक आलेल्या पावसामुळे गोंधळ उडाला. दोन चाकी वाहनधारकांची त्रेधा उडाली; काही जणांनी झाडाखाली, तर काहींनी बस स्टॉपचा आसरा घेतला. अचानक आलेल्या या पावसाने रस्त्यांवर वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली, परंतु अनेकांनी याचा मनमुराद आनंदही घेतला.

पावसाच्या सरींसोबत आलेल्या गार वाऱ्याने वातावरण थोडं शांत झालं. पण कार्यालयाला जाणारे कर्मचारी, काही शाळांचे विद्यार्थी आणि दुचाकीवरून प्रवास करत असलेल्यांना पावसाने भिजवून टाकले. असे असले तरी काही लहान मुलांनी मात्र पावसात भिजण्याचा मनसोक्त आनंद घेतला. अचानक आलेल्या पावसामुळे काही ठिकाणी थोड्या बहुत प्रमाणात पाणी साचले.

हवामान विभागाने आधीच काही भागांत उकाड्याचा आणि काही भागांत पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. ही स्थिती येत्या काही दिवसांत पुन्हा निर्माण होऊ शकते असेही सांगण्यात आले आहे. वातावरणातील बदल आणि ढगाळ हवामान पाहता पुढील दोन-तीन दिवस थोड्या फार सरींचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आजचा पाऊस हा केवळ हवामानातील बदल नव्हे, तर उकाड्याने हैराण झालेल्या नवी मुंबई आणि पनवेलकरांसाठी दिलासा ठरला.

English
हिंदी सारांश
Web Title : Sudden Rain, Thunderstorms Disrupt Panvel, Navi Mumbai; Relief from Heat

Web Summary : Panvel and Navi Mumbai experienced sudden rainfall with thunderstorms, disrupting daily life but providing relief from the intense heat. Commuters faced difficulties, while children enjoyed the rain. The weather department forecasts similar conditions in the coming days.
टॅग्स :RainपाऊसpanvelपनवेलRaigadरायगडalibaugअलिबागNavi Mumbaiनवी मुंबईweatherहवामान अंदाज