Join us
Daily Top 2Weekly Top 5

लग्नसराईपूर्वी सोन्या-चांदीत घसरण; जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 10:50 IST

Gold Silver Price 21 April: लग्नसराईपूर्वी सोने-चांदीच्या दरात घसरण झाल्याने ग्राहकांसाठी ही दिलासादायक बाब ठरू शकते.

Gold Silver Price Today 21 April: लग्नाचा हंगाम जवळ आला आहे. या पार्श्वभूमीवर, सोन्या-चांदीच्या दरात आजही(दि.२१) घसरण दिसून येत आहे. चांदीच्या दरात सुमारे ₹१,७५० ची घट झाली. तर, देशातील कमोडिटी बाजार Multi Commodity Exchange (MCX) वर ५ जून २०२६ एक्सपायरी असलेले गोल्ड फ्युचर्स सुमारे १९० रुपयांनी घसरले.

सोन्याचे दर

ओपनिंग दर: १,५३,८०० रुपये (प्रति १० ग्रॅम)मागील बंद दर: १,५३,९९२ रुपयेसकाळी ९:५५ वाजता: ०.१२% घसरणीसह १,५३,७५२ रुपये

सुरुवातीच्या व्यवहारात सोने १,५३,९९२ रुपयांच्या उच्चांकापर्यंत गेले होते, मात्र त्यानंतर घसरण झाली.

चांदीत मोठी घसरण

एमसीएक्सवर ५ मे २०२६ एक्सपायरी असलेली चांदी ०.७१% म्हणजेच सुमारे १,७९३ रुपयांनी घसरली.

ओपनिंग दर: २,५०,४२८ रुपये (प्रति किलो)दिवसातील उच्चांक: २,५१,२२२ रुपयेस्पॉट मार्केटमधील चांदीचे दर

तुमच्या शहरातील चांदीचे पाहा...

दिल्ली 

२४ कॅरेट: १,५५,४४० रुपये२२ कॅरेट: १,४२,५०० रुपये१८ कॅरेट: १,१६,६२० रुपये

मुंबई

२४ कॅरेट: १,५५,२९० रुपये२२ कॅरेट: १,४२,३५० रुपये१८ कॅरेट: १,१६,४७० रुपये

चेन्नई

२४ कॅरेट: १,५६,००० रुपये२२ कॅरेट: १,४३,००० रुपये१८ कॅरेट: १,१८,५०० रुपये

कोलकाता

२४ कॅरेट: १,५५,२९० रुपये२२ कॅरेट: १,४२,३५० रुपये१८ कॅरेट: १,१६,४७० रुपये

अहमदाबाद

२४ कॅरेट: १,५५,३४० रुपये२२ कॅरेट: १,४२,४०० रुपये१८ कॅरेट: १,१६,५२० रुपये

लखनौ

२४ कॅरेट: १,५५,४४० रुपये२२ कॅरेट: १,४२,५०० रुपये१८ कॅरेट: १,१६,६२० रुपये

पाटणा

२४ कॅरेट: १,५५,३४० रुपये२२ कॅरेट: १,४२,४०० रुपये१८ कॅरेट: १,१६,५२० रुपये

हैदराबाद

२४ कॅरेट: १,५५,२९० रुपये२२ कॅरेट: १,४२,३५० रुपये१८ कॅरेट: १,१६,४७० रुपये

एकूणच लग्नसराईपूर्वी सोने-चांदीच्या दरात घसरण झाल्याने ग्राहकांसाठी ही दिलासादायक बाब ठरू शकते. मात्र जागतिक बाजारातील हालचाली आणि डॉलरच्या चढ-उतारावर पुढील दर अवलंबून राहणार असल्याने गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेणे गरजेचे आहे.

(टीप- इथे फक्त सोन्या-चांदीच्या दरांविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक तज्ञाचा सल्ला घ्या.)

English
हिंदी सारांश
Web Title : Gold and Silver Prices Drop Before Wedding Season: Latest Rates

Web Summary : Good news for buyers! Gold and silver prices fell ahead of the wedding season. Silver dropped significantly, while gold futures also saw a decline. Check city-wise rates before investing. Experts advise caution due to market fluctuations.
टॅग्स :सोनंचांदीगुंतवणूक