शहरं
Join us  
Trending Stories
1
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
2
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
3
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
5
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
6
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
7
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
8
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
9
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
10
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
11
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
12
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
13
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
14
मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला
15
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
16
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
17
उमर खालिदला दिलासा नाहीच, जामीन याचिका फेटाळली; दिल्ली कोर्टाने फटकारले, नेमके काय घडले?
18
"सायोनी घोष यांचं शीर...!"; भाजप नेत्याचं वादग्रस्त विधान, केली १ कोटींची घोषणा; पक्ष म्हणाला- त्यांचे वैयक्तिक विचार 
19
बारसू, पूर्णगड, सिंधुदुर्गात अणुऊर्जा प्रकल्प होणार; CM फडणवीसांच्या उपस्थितीत सामंजस्य करार
20
Payal Kapadia : नेत्रदीपक भरारी! पायल कपाडिया यांनी रचला इतिहास; कान्सच्या 'क्रिटिक्स वीक' ज्युरी अध्यक्षपदी निवड
Daily Top 2Weekly Top 5

‘ते’ पाच आरोपी देणार आज जबाब; नितीन देसाई आत्महत्या प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 09:23 IST

एन. डी. स्टुडिओचे कायदेशीर सल्लागार, आर्थिक सल्लागार व अकाऊंटंट यांच्याकडूनही सदर कर्ज प्रकरणाबाबत तपास अधिकारी माहिती घेत आहेत.  

लोकमत न्यूज नेटवर्क 
अलिबाग : कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल झाला असून, संबंधित आरोपी मंगळवारी सकाळी १० वाजेपर्यंत खालापूर पोलिस ठाणे येथे वकिलांसोबत माहिती घेऊन उपस्थित राहणार आहेत. त्यांचा जबाब नोंदविला जाणार आहे. 

एन. डी. स्टुडिओचे कायदेशीर सल्लागार, आर्थिक सल्लागार व अकाऊंटंट यांच्याकडूनही सदर कर्ज प्रकरणाबाबत तपास अधिकारी माहिती घेत आहेत.  तसेच गुन्ह्याच्या अनुषंगाने आतापर्यंत १५ साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. नितीन देसाई यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा खालापूर पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. 
देसाई यांच्या पत्नी नेहा देसाई यांनी खालापूर पोलिस ठाण्यात लेखी तक्रार केली होती. त्यानुसार केयुर मेहता, रशेष शहा, स्मित शहा, ईएआरसी कंपनीचे आर. के. बन्सल, प्रशासक जितेंद्र कोठारी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. 

त्यांना ८ ऑगस्टपर्यंत खालापूर पोलिस ठाण्यात समक्ष हजर राहून जबाब देण्याबाबत खालापूर पोलिसांनी नोटीस दिली होती. जबाब सादर करण्याबाबत नोटीसद्वारे समज देण्यात आलेली होती. 
    कंपनीतर्फे नितीन देसाई यांना त्रास दिला नसल्याचा  खुलासा आराेपींनी केला आहे. 
    मात्र, मंगळवारी ते पाचही जण खालापूर पोलिस ठाण्यात उपस्थित राहून त्यांची बाजू पोलिसांकडे मांडणार आहेत.

टॅग्स :Nitin Chandrakant Desaiनितीन चंद्रकांत देसाई