शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
4
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
5
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
7
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
8
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
9
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
10
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
11
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
12
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
13
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
14
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
15
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
16
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
17
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
18
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
19
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
20
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
Daily Top 2Weekly Top 5

सुधागडमधील तांबडमाळ गाव अंधारात; ऐन सणात बत्ती गुल झाल्याने संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 05:43 IST

सुधागड तालुक्यातील महावितरणचा भोंगळ कारभार सुरू असून घोटावडे ग्रामपंचायतीतील तांबडमाळ गाव गेल्या चार दिवसांपासून अंधारात आहे.

पाली : सुधागड तालुक्यातील महावितरणचा भोंगळ कारभार सुरू असून घोटावडे ग्रामपंचायतीतील तांबडमाळ गाव गेल्या चार दिवसांपासून अंधारात आहे. याबाबत महावितरणकडे तक्रार करूनही अद्याप कोणतीच कार्यवाही होत नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.५ आॅक्टोबर रोजी कोसळलेल्या जोरदार पावसामुळे तांबडमाळ येथील दोन विद्युत खांब पडले होते. विद्युत खांब पडून घरांवर जिवंत विद्युत तारा पडल्या; दैव बलवत्तर म्हणून जीवितहानी झाली नाही. धोकादायक झालेल्या विद्युत खांबांबाबत अनेकदा तक्रार देण्यात आली होती. महावितरणकडे तक्रारी करून दुर्लक्ष केले गेले. अखेर ५ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ६ ते ७ वाजण्याच्या सुमारास जोराच्या वाऱ्यामध्ये विद्युत खांब कोसळले, तेव्हापासून आजतागायत तांबडमाळ ग्रामस्थ अंधारात आहेत.महावितरण तांबडमाळ ग्रामस्थांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करीत असल्याचा अरोप ग्रामस्थ करत आहेत. महावितरणच्या दुर्लक्षामुळे गेल्या चार दिवसांपासून विजेअभावी अंधारातच राहण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांकडून संपर्क केला असता, वीजपुरवठा सुरळीत करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मात्र, चार दिवस होऊनही याकडे कोणीच फिरकले नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Raigadरायगड